Advertisement

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ८० जणांना उमेदवारी जाहीर

नवरात्रीच्या घटस्थापनेचा मुहूर्त साधून शिवसेनेनं ८०हून अधिक उमेदवारांना एबी अर्जांचं वाटप केलं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ८० जणांना उमेदवारी जाहीर
SHARES

नवरात्रीच्या घटस्थापनेचा मुहूर्त साधून शिवसेनेनं ८०हून अधिक उमेदवारांना एबी अर्जांचं वाटप केलं आहे. भाजपबरोबर युतीची अधिकृत घोषणा होण्याआधीच शिवसेनेनं उमेदवारांची घोषणा केली. तसंच, यंदा पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवणार आहे. त्यानुसार, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी करीत आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या उमेदवारीची घोषणा शिवसेनेनं केलेली नाही.

एबी अर्जांचं वाटप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा यांच्यासमवेत युती व जागावाटपाच्या चर्चेसाठी रविवारी रविवारी नवी दिल्लीत बैठक झाली. त्यावेळी शिवसेना-भाजपनं युती होणार असल्याचं स्पष्ट केलं. तसचं, शिवसेनेकडं असलेल्या जागांवरील काही उमेदवारांना पक्षाचे एबी अर्जही देण्यात आल्याची माहिती प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली. 

या आमदारांना पुन्हा उमेदवारी
औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट, कोल्हापूर-उत्तरमधून राजेश क्षीरसागर, सावंतवाडी मतदारसंघातून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. करवीरमधून चंद्रदीप नरके, शाहूवाडीतून सत्यजित पाटील, राधानगरीतून प्रकाश आबिटकर, शिरोळमधून उल्हास पाटील या आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. 

चंदगडमधून संग्राम कुपेकर, कागलमधून संजय घाडगे हे शिवसेनेकडून रिंगणात असणार आहेत. तसंच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या उमेदवारांना अर्जाचे वाटप केले. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून रवींद्र वायकर तर पुरंदरमधून विजय शिवतारे या मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

हे आहेत उमेदवार 

योगेश रामदास कदम (दापोली)अर्जुन खोतकर (जालना), विजय शिवतरे (पुरंदर), नागेश अष्टीकर-पाटील (हडगाँव), हेमंत एस पाटील (नांदेड दक्षिण), सुभाष सबने (डिग्लूर एससी), जयप्रकाश मुंदडा (बासमथ), राहुल पाटील (परभणी), हर्षवर्धन जाधव (कन्नड), संदीप भामरे (पैठण) आणि ज्ञानराज चौगेअनुसूचित जाती)


हेही वाचा -

नवरात्रौत्‍सव निमित्त मुंबई पोलीस सज्ज

मनसे ५ ऑक्टोबरला फोडणार प्रचाराचा नारळ?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा