Advertisement

दिवाळी संपली तरी बेस्टचे कर्मचारी बोनसच्या प्रतीक्षेत

बेस्ट कर्मचाऱ्यांना ५५०० रुपयांचा बोनस देण्याचं जाहीर केलं होतं. मात्र, दिवाळी संपली तरी अद्याप बेस्टचे कर्मचारी बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान प्रशासकीय तरतूद न झाल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस न दिल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे.

दिवाळी संपली तरी बेस्टचे कर्मचारी बोनसच्या प्रतीक्षेत
SHARES

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आपल्यालाही १५ हजार रुपये बोनस मिळावा, अशी मागणी बेस्टच्या कर्मचाऱ्यांकडून सतत केली जात होती. या मागणीनंतर बेस्ट समितीच्या बैठकीत महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना ५५०० रुपयांचा बोनस देण्याचं जाहीर केलं होतं. मात्र, दिवाळी संपली तरी अद्याप बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनसच मिळालेला नाही. प्रशासकीय तरतूद न झाल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस न दिल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे.


बोनसकरीता झाली चर्चा

बेस्टच्या एकूण ४० हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या तोट्यात असणाऱ्या बेस्ट प्रशासनाला २२ कोटी रुपये खर्च करावं लागणार होतं. कर्मचाऱ्यांच्या बोनसकरता बेस्टचे महाव्यवस्थापक आणि महापालिका आयुक्त यांच्यात चर्चा झाली होती. त्यावेळी महाव्यवस्थापकांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा ५५०० रुपयांचा बोनस मिळणार असल्याचं जाहीर केलं होतं.


बोनस कधी मिळणार?

मागील वर्षी बेस्टला महापालिकेतर्फे सानुग्रह अनुदानाकरता अागाऊ रक्कम देण्यात आली होती. बेस्टने या रकमेतून कर्मचाऱ्यांना ५५०० रुपये सानुग्रह अनुदान दिलं होतं. परंतु, बेस्ट उपक्रमात आर्थिक सुधारणा न झाल्याने ही रक्कम ११ सामान हप्त्यांमध्ये कापून घेण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या दिवाळीचा बोनस बेस्ट कर्मचाऱ्यांना कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


दिवळीच्या आधी झालेल्या बेस्ट समीतीच्या बैठकीमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांना ५५०० रुपयांचा बोनस जाहीर केला होता. परंतु, प्रशासकीय तरदूत न झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांना बोनस अजून देण्यात आलेला नाही. आता यावर लवकरच निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येईल.

- आशिष चेंबूरकर, बेस्ट समिती अध्यक्ष 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा