Advertisement

अनेक मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी आझाद मैदानात एल्गार पुकारणार

आझाद मैदानात एल्गार पुकारण्याचा पवित्रा बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

अनेक मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी आझाद मैदानात एल्गार पुकारणार
SHARES

बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई (Mumbai) महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण करावा, यासह अन्य मागण्यासाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं १७ फेब्रुवारी रोजी 'चलो मंत्रालया'ची हाक दिली होती. मात्र, राणी बाग ते मंत्रालय दरम्यान काढण्यात येणाऱ्या मोर्चाला राज्य शासनानं परवानगी नाकारली आहे. त्यामुळं बुधवारी आझाद मैदानातच एल्गार पुकारण्याचा पवित्रा बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

मागील काही वर्षे सातत्यानं बेस्टच्या परिवहन विभागाचा तोटा वाढत आहे. बेस्टच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात विद्युत विभागालाही तोट्यात जाणार असल्याचं दाखविण्यात आलं आहे. बेस्टनं सध्या भाडेतत्त्वावर बसगाड्या घेऊन खासगीकरण सुरू केलं आहे. बेस्टला सावरण्यासाठी मुंबई महापालिकेनं निधी देण्याची गरज आहे. 

बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याची मागणी कामगार संघटनांकडून मागील ३ ते ४ वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, त्याकडं दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप कृती समितीकडून करण्यात आला आहे. ७ ऑगस्ट २०१७ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आश्वासनही दिलं होतं.

परंतु, त्यानंतरही मागणी मान्य झाली नाही. याच मागण्यांसाठी मंगळवारी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा 'बेस्ट' कर्मचारी संघटनांनी दिला होता. मात्र, राज्य सरकारनं मोर्चाला परवानगी नाकारल्यानं दुपारी ३ वाजता आझाद मैदानात कर्मचारी जमतील, अशी माहिती शशांक राव यांनी दिली.



हेही वाचा -

कोरोना रुग्णांमध्ये वाढ, राज्य सरकार मोठा निर्णय घेणार?

तर लाॅकडाऊन हाच शेवटचा पर्याय, राजेश टोपेंचा इशारा


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा