Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार आणखी काही दिवस लांबणीवर

बेस्टने आर्थिक तोटामुळे कर्मचाऱ्यांचा पगार काही दिवस पुढे लांबवण्याची विनंती औद्योगिक न्यायालयासमोर केली होती. बेस्टची ही विनंती मान्य झाली असून कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचा पगार ३० मार्च रोजी आणि पुढच्या तीन महिन्यांचा पगार २० तारखेला दिला जाणार आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार आणखी काही दिवस लांबणीवर
SHARES

गेल्या काही वर्षांपासून बेस्ट उपक्रम आर्थिक तोटा सहन करत आहे. त्यामुळे या आर्थिक संकटाचा फटका बेस्टमधील ४० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना बसत आहे. कारण, बेस्ट कर्मचाऱ्यांना पगार उशिराने मिळत असून, कर्मचाऱ्यांना पगारासाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.

बेस्टने आर्थिक तोटामुळे कर्मचाऱ्यांचा पगार काही दिवस पुढे लांबवण्याची विनंती औद्योगिक न्यायालयासमोर केली होती. बेस्टची ही विनंती मान्य झाली असून कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचा पगार ३० मार्च रोजी आणि पुढच्या ३ महिन्यांचा पगार २० तारखेला दिला जाणार आहे. त्यामुळे पगारासाठी आणखी ५ दिवस लागणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.


औद्योगिक न्यायालयाची मंजुरी

बेस्ट उपक्रम तोट्यात असल्याने प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या पगारासह बाकीचा खर्चासाठी आर्थिक चणचण येत असल्याची भूमिका घेत औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी बेस्टच्या प्रवाशांमध्ये घट झाल्याने उत्पनात घट होत आहे. त्यामुळे पगार देण्याकरीता आणखी काही दिवसांचा कालावधी वाढवून देण्याची भूमिका बेस्टने न्यायालयात मांडली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान औद्योगिक न्यायालयाने मुदतवाढीच्या विनंतीला मंजुरी दिली आहे.


कर्जाचा मार्ग

बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात असल्याने कर्मचाऱ्यांना दरमहा वेळेवर पगार देता येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी कर्जाचा मार्ग स्वीकारून बेस्ट कर्मचाऱ्यांना पगार देते. तसंच, बेस्ट कर्मचाऱ्यांना पगार उशिराने मिळत असल्याने त्यांना आर्थिक समस्यांना सामोर जावं लागत आहे. 



हेही वाचा -

खोतकर-ठाकरे भेटीनंतरही तोडगा नाहीच; जालन्याच्या जागेवर रविवारी अंतिम निर्णय

मुंबईच्या वरिष्ठ निवड समिती सदस्यांचे राजीनामे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा