बेस्टने पगारात वाटली दीड कोटींची नाणी

दररोज २९ लाख प्रवासी बेस्टच्या बसने प्रवास करतात. प्रवाशांकडून महिन्याभरात १० रुपयांच्या नाण्याच्या रुपात बेस्टकडे अंदाजे ७५ लाख रुपये जमा होतात. बहुतांश वेळेला ही नाणी बँकेत जमा केली जातात किंवा थर्ड पार्टीला दिली जातात. परंतु यंदा बँकेने ही नाणी घेण्यास नकार दिल्याने बेस्टने ही नाणी कर्मचाऱ्यांना पगाराच्या रुपात देण्याचा निर्णय घेतला.

बेस्टने पगारात वाटली दीड कोटींची नाणी
SHARES

बेस्टनं प्रवास करण्यासाठी प्रवाशांना नेहमीच खिशात सुटे पैसे ठेवावे लागतात. खिशात सुटे पैसे नसतील तर कंडक्टरसोबत वाद झालाच म्हणून समजा. प्रवाशांकडून नेहमीच हवी हवीशी असणारी नाणी बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी आता मात्र डोकेदुखीची ठरत आहे. या मागचं कारण म्हणजे बेस्ट प्रशासनाने आपल्या ३५ हजार कर्मचाऱ्यांना दीड कोटी रुपयांचा पगार नाण्यांच्या स्वरूपात दिला आहे. बेस्टने कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारातील ४०० रुपये १० रुपयांच्या नाण्यांच्या रुपयात दिले आहेत.

१० रुपयांची ४० नाणी

वरळीतील एका बेस्ट कर्मचाऱ्याने सांगितलं की, बेस्ट प्रशासनाने आम्हाला नोव्हेंबर महिन्याचा पगार देताना ४०० रुपयांची ठराविक रक्कम १० रुपयांच्या (१० x ४०) नाण्याच्या रुपात रोख दिली. तर उरलेला पगार बँकेत जमा करण्यात आला आहे. हा पगार घेण्यावाचून आमच्याकडे पर्याय नव्हता.

'अशी' जमा होतात नाणी

दररोज २९ लाख प्रवासी बेस्टच्या बसने प्रवास करतात. प्रवाशांकडून महिन्याभरात १० रुपयांच्या नाण्याच्या रुपात बेस्टकडे अंदाजे ७५ लाख रुपये जमा होतात. बहुतांश वेळेला ही नाणी बँकेत जमा केली जातात किंवा थर्ड पार्टीला दिली जातात. परंतु यंदा बँकेने ही नाणी घेण्यास नकार दिल्याने बेस्टने ही नाणी कर्मचाऱ्यांना पगाराच्या रुपात देण्याचा निर्णय घेतला.

दररोज बेस्टची फेरी सुरू करताना बसमधील कंडक्टर यांना आगारातून १,२ आणि ५ रुपयांच्या नाण्यांच्या रुपयात सुटे १०० रुपये दिले जातात.हेही वाचा-

ख्रिसमससाठी कोकण रेल्वेवर विशेष ट्रेन

बेस्ट कर्मचारी ८ जानेवारीपासून संपावरसंबंधित विषय