Advertisement

प्रवासी संख्या घटल्यामुळं बेस्टच्या ताफ्यातील १००० बस रद्द

मुंबईसह आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या कोरोनाचा बेस्ट उपक्रमालाही मोठा फटका बसला आहे.

प्रवासी संख्या घटल्यामुळं बेस्टच्या ताफ्यातील १००० बस रद्द
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या कोरोनाचा बेस्ट उपक्रमालाही मोठा फटका बसला आहे. मुंबईत वाढत्या कोरोनामुळं कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळं बेस्टची प्रवासी संख्या घटली आहे. संख्या घटल्यामुळं बेस्टनं आपल्या ताफ्यातील १००० बस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बुधवारी बेस्ट प्रशासनानं निर्णय घेतला आहे.

प्रवाशांची संख्या घसरल्यामुळं बस सेवांची संख्या १० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. बेस्टनं २०० डबल डेकर बस खरेदी करण्यासाठी बीएमसीकडे यापूर्वी संपर्क साधला असून आता त्या ४५ बसेसवर आहेत. वाढत्या कोरोनामुळं सर्वसामान्यांना प्रवासास मनाई करण्यात आली असून केवळ आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच बस आणि ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी आहे. त्यामुळं प्रवासी संख्या घटली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला कडक निर्बंध जाहीर झाल्यापासून दररोजच्या बसमधील प्रवाशांची संख्या ११ ते १६ लाखांवर आली आहे. याआधी बेस्टच्या प्रवासी संख्या २५ ते २७ लाख होती. सध्याच्या बसच्या वेळापत्रकानुसार बेस्टकडे २०६८ बसेस आहेत आणि त्यामध्ये २३ एसी आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा