Advertisement

बेस्टच्या ताफ्यात विजेवर धावणाऱ्या आणखी १०० बस दाखल

बेस्ट उपक्रमानं इंधनाची बचत करण्यासाठी आपल्या ताफ्यात पर्यावरणस्नेही बसगाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

बेस्टच्या ताफ्यात विजेवर धावणाऱ्या आणखी १०० बस दाखल
SHARES

बेस्ट उपक्रमानं इंधनाची बचत करण्यासाठी आपल्या ताफ्यात पर्यावरणस्नेही बसगाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, विजेवर धावणाऱ्या १०० पेक्षा अधिक बसगाड्या मार्च २०२१ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळं ताफ्यातील विजेवरील बसगाड्यांची संख्या वाढून २०० च्या घरात पोहोचेणार आहे.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या ‘फेम-२’अंतर्गत विजेवरील बसगाडय़ांची योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत बेस्टच्या ताफ्यात ३४० बसगाड्या दाखल करण्याचा निर्णय झाला होता. यामध्ये २०० मिडी आणि १४० एकमजली बसगाड्यांचा समावेश आहे. 

मिडी बसमध्ये काही एसी, तर काही नॉनएसी बस आहेत. एका आठवड्यात किंवा १० दिवसांत २५ बस याप्रमाणे महिन्याला विजेवरील १०० बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल करण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात विजेवरील ९६ बस असून त्या मिडी एसी व सिंगर डेकर स्वरूपाच्या आहेत. आता मार्च महिन्याच्या अखेपर्यंत आणखी १०० पेक्षा जास्त मिडी एसी बस ताफ्यात दाखल होणार आहेत. 

विजेवरील बसची संख्या २०० पर्यंत पोहोचणार आहे. मार्चपर्यंत विजेवरील बसचा ताफा एकूण ३८६ पर्यंत नेण्यात येणार होता. परंतु, त्यात बेस्टला अपयशच आलं आहे. सामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा पूर्णपणे सुरू झालेली नाही. त्याप्रमाणं येणाऱ्या नवीन बसगाड्यांचं नियोजन केलं जाणार आहे. 

याशिवाय रुग्णालयं, सरकारी व खासगी कार्यालय कर्मचाऱ्यांनाही सेवा देण्यासाठी या बसचा मार्ग निश्चित केला जाणार आहे. कोरोनाकाळापूर्वी बेस्ट बसगाड्यांमधून ३३ लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करत होते. लॉकडाऊनमध्ये हीच संख्या कमी झाली. परंतु जून महिन्यापासून लॉकडाऊन शिथिल होऊ लागला.

सरकारी व खासगी कार्यालयीन कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती वाढविण्यात आली. त्यामुळं बेस्ट प्रवाशांची संख्या काही प्रमाणात वाढून साधारण २५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यातील ३,५०० बसगाडय़ांबरोबरच भाडेतत्त्वावरील एसटीच्या ८०० बसगाडय़ाही प्रवाशांच्या सेवेत आहेत. मार्चमध्ये ताफ्यातील बसची संख्या आणखी वाढेल. त्यामुळे प्रवास काहीसा सुकर होण्यास मदत होणार आहे.



हेही वाचा - 

नियमांचं पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरं जा, मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

IRCTC कडून नवीन पेमेंट गेटवे लाँच


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा