गोरेगावमध्ये धावणार बेस्टची मिडी बस!

 Goregaon
गोरेगावमध्ये धावणार बेस्टची मिडी बस!
Goregaon , Mumbai  -  

बीएसटीच्या बसकडे पाठ फिरवलेल्या प्रवाशांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी बेस्ट सध्या वेगवेगळे उपक्रम राबवताना दिसत आहे. त्याचप्रमाणे बेस्टने आता प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन गोरेगाव स्टेशनपासून ते गोरेगाव लिंक या मार्गावरून बेस्टची 662 क्रमांकांची मिडी बस मंगळवारपासून सुरू केली आहे. या मार्गावर प्रत्येकी 4 गाड्या धावणार असून पहिली बस गोरेगाव स्थानक येथून सकाळी 6 वाजता सुटेल. तर रात्री 9.30 वाजता शेवटची बस सुटेल.

या नवीन बसमुळे मोठा दिलासा मिळाला असून यामुळे मुजोर रिक्षा चालकांनाही जरब बसणार असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.


बसचे वर्तुळाकार मार्ग

 • गोरेगाव स्थानक ते हिराबाई वल्लभभाई पटेल मार्ग
 • महिला समाज मार्ग, जवाहरनगर
 • स्वामी विवेकानंद मार्ग
 • फिल्मीस्तान, महर्षी दयानंद चौक
 • महात्मा गांधी मार्ग, श्रीहरी मंदिर मार्ग
 • उन्नत नगर महापालिका शाळा
 • पी. डी. बांगड चौक
 • जयचंदलाल कारवा मार्ग
 • प्रिझम टॉवर, महापालिका उद्यान
 • सहायक मार्ग, आर. आर. पिल्ले चौक
 • इनॉर्बिट मॉल, भगवान विश्वकर्मा मार्ग
 • हुसैनी चौक, प्रेमनगर, उन्नतनगर मार्ग
 • उन्नतनगर महापालिका शाळा
 • श्री हरी मंदिर मार्ग, महात्मा गांधी मार्ग
 • महर्षी दयानंद सरस्वती चौक
 • स्वामी विवेकानंद मार्ग, जैन मंदिर
 • हिराभाई वल्लभदास पटेल मार्ग, गोरेगाव स्थानक पश्चिमडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


Loading Comments 
 • Live: MMPL Cricket Tournament - Shivaji Park SuperStars Vs Mulund Master Blaster