Advertisement

बेस्टही चालवणार ‘लेडिज स्पेशल’ बस

केवळ महिला प्रवाशांसाठी ३७ बस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला नुकतीच बेस्ट समितीच्या बैठकीत सर्वसहमतीने मंजुरी देण्यात आली.

बेस्टही चालवणार ‘लेडिज स्पेशल’ बस
SHARES

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर कार्यालयीन वेळेत महिलांसाठी विशेष ‘लेडिज स्पेशल’ लोकल ट्रेन चालवण्यात येते. याच धर्तीवर आता बेस्ट प्रशासनाने देखील महिलांसाठी विशेष बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.  

 प्रस्तावाला मंजुरी

केवळ महिला प्रवाशांसाठी ३७ बस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला नुकतीच बेस्ट समितीच्या बैठकीत सर्वसहमतीने मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे येत्या साडेचार महिन्यांमध्ये शहरात महिलांसाठी बेस्ट बस धावू लागेल. सद्यस्थितीत नवी मुंबईत महिलांसाठी विशेष बस चालवण्यात येतात.  

राज्य सरकारच्या ‘तेजस्वीनी’ बस योजनेनुसार शहरात गर्दीच्या वेळेस महिलांसाठी विशेष बस सेवा चालवण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांसाठी ३७ नव्या बस खरेदी करण्यात येणार आहेत.  

राज्य सरकारकडून निधी

या नाॅन एसी बस मध्यम (मिडी) आकाराच्या असतील. तसंच त्या डिझेलवर धावणाऱ्या असतील. यातील प्रत्येक बसची किंमत २९ लाख रुपयांच्या जवळपास असेल. या बससेवेसाठी बेस्ट प्रशासनाला ११ कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. या सर्व बस खरेदीसाठी तेजस्वीनी योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून निधी देण्यात येईल. 



हेही वाचा-

बेस्ट कर्मचाऱ्यांचा ६ आॅस्टपासून संपाचा इशारा

गैरसोईंच्या गर्तेत मोनो रेल्वे!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा