बेस्ट कर्मचाऱ्यांचा ६ आॅस्टपासून संपाचा इशारा

मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासनाकडून दिलेल्या मुदतीत काहीही हालचल न झाल्यास ६ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनने दिला आहे.

SHARE

पगारवाढीसह अन्य मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासनाकडून दिलेल्या मुदतीत काहीही हालचल न झाल्यास ६ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनने दिला आहे. 

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनापासून इतर अनेक मागण्या प्रलंबित आहेत. वारंवार आंदोलन आणि संप करुनही सरकारकडून दखल घेतली जात नाही, असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहेत मागण्या?

  • बेस्ट उपक्रमाचा ‘क’ अर्थसंकल्प मनपाच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची त्वरीत अंमलबजावणी करावी  
  • सन २००७ पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची रू ७९३० ने सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने त्वरीत वेतननिश्चिती करावी
  • एप्रिल २०१६ पासून लागू करावयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने वाटाघाटी सुरू कराव्यात 
  • सन २०१६-१७ व २०१७-१८ करीता मुंबई मनपा कर्मचाऱ्यांइतका बोनस द्यावा
  • कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न तातडीने सोडवावा
  • अनुकंपा भरती तातडीने सुरू करावी

बेस्ट प्रशासनाने तिकीटाच्या मूल्यात घट केल्यामुळे बेस्टच्या प्रवाशांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हळूहळू बेस्टचा नफाही वाढू लागला आहे. त्यातच कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

बेस्ट कर्मचारी आणि सरकारमध्ये तोडगा न निघाल्यास ६ आॅगस्ट पासून जवळपास ३० हजार बस रस्त्यावर उतरणार नाहीत, असा अंदाज आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.   हेही वाचा-

‘बेस्ट ट्रॅफिक व्हायोलेशन’ मोहिमेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

बेस्ट उपक्रमाताली कर्मचाऱ्यांची मुलं होणार कंत्राटी बसचालकसंबंधित विषय
ताज्या बातम्या