बेस्टतर्फे बकरी ईदसाठी जादा बस


SHARE

बकरी ईद सणादरम्यान मुस्लिम बांधव आपापल्या कुटुंबासहित नातेवाईक, मित्रमंडळींकडे जाणं पसंत करतात. तसंच खरेदीसाठी देखील मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये येतात. हे लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या सोईसाठी ईदनिमित्त जादा बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.


कधी सोडणार बस?

२२ आॅगस्ट रोजी बकरी ईद असून २३ तारखेला बासी ईद साजरी करण्यात येणार आहे. या दोन्ही दिवशी बेस्ट उपक्रमातर्फे ५२ जादा बस सोडण्यात येणार आहेत.


'या' मार्गावर जादा बस

बसमार्ग क्रमांक ३, ७ मर्या., ८ मर्या.,२८, ३३, ३७, ८८, १२४, १८०, २०३, २३१, २५६, २७१, ३३२, ३५०, ३५५ मर्या., ३५७, ३७५ मर्या., ३७६, ४०८, ५१७ मर्या. आणि ५२४ मर्या. वर जादा बस सोडण्यात येतील.


बस निरीक्षकाची सोय

प्रवाशांच्या मदतीसाठी गर्दी असणाऱ्या बसथांब्यावर बसनिरीक्षकांची तसंच वाहतूक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात बेस्ट बस उपक्रमाचा लाभ घ्यावा, असं आवाहनही करण्यात आलं आहे.हेही वाचा-

मेट्रोचा पिलर बेस्टवर कोसळला, सुदैवाने कुणालाही दुखापत नाही

बेस्टचा तोटा १८०० कोटींवरसंबंधित विषय
ताज्या बातम्या