Advertisement

बीकेसीत वर्तुळाकार जलद बेस्ट मार्ग सुरू

बेस्ट उपक्रमाने कर्मचाऱ्यांच्या सोईकरीता गुरुवारपासून बीकेसीत नवीन वर्तुळाकर जलद बस (काॅरिडाॅर) मार्ग सुरू केला आहे. वांद्रे टर्मिनस मार्गे भारत डायमंड बोर्स, डायमंड मार्केट या दरम्यान हा नवीन बस मार्ग चालविण्यात येणार आहे.

बीकेसीत वर्तुळाकार जलद बेस्ट मार्ग सुरू
SHARES

बेस्ट उपक्रमाने कर्मचाऱ्यांच्या सोईकरीता गुरुवारपासून बीकेसीत नवीन वर्तुळाकर जलद बस (काॅरिडाॅर) मार्ग सुरू केला आहे. वांद्रे टर्मिनस मार्गे भारत डायमंड बोर्स, डायमंड मार्केट या दरम्यान हा नवीन बस मार्ग चालविण्यात येणार आहे. या मार्गावरील बस केवळ सकाळ आणि संध्याकाळ अशा २ वेळेस सुरू राहतील, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.


कर्मचाऱ्यांना सोयीचा

बीकेसीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा बसमार्ग उपयुक्त ठरणार आहे. या विभागात मोठ्या संख्येने खासगी कार्यालय असून तेथील कर्मचाऱ्यांची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. अशा कर्मचाऱ्यांसाठी हा जलद मार्ग सोयीचा ठरेल, असं बेस्ट उपक्रमाचं म्हणणं आहे.


'असा' असेल मार्ग

हा बसमार्ग वांद्रे रेल्वे टर्मिनसवरून वांद्रे स्थानक पूर्व, अनंत काणेकर मार्ग, भास्कर न्यायालय, सर अलियावर जंग मार्ग, कला नगर, धरावी वांद्रे जोड मार्ग, खान अब्दुल गफार खान मार्ग, (बीकेसी), आयसीआयसीआय बँक जंक्शन, लक्ष्मी टॉवर, मुंबई क्रिकेट असोसिएशन संकुल, भारत डायमंड बोर्स, डायमंड मार्केट मार्गावरून पुन्हा वांद्रे रेल्वे टर्मिनस येथे येऊन संपेल.


जलदगती मार्ग

विशेष म्हणजे हा वर्तुळाकार मार्ग जलदगती असल्यामुळे या मार्गावर चालवण्यात येणाऱ्या बस ठराविक स्थानकांवरच थांबणार आहेत. वांद्रे टर्मिनस, वांद्रे स्थानक पूर्व, वांद्रे बसस्थानक पूर्व, भारत नगर, आयसीआयसीआय बॅंक, लक्ष्मी टॉवर, डायमंड मार्केट या मार्गावरील बस स्थानकावरच बस थांबविण्यात येणार आहे.



हेही वाचा-

१ डिसेंबरपासून बेस्ट बसच्या फेऱ्यांमध्ये 'असे' होणार बदल

'या' कारणांमुळे बेस्ट उपक्रम तोट्यात


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा