Advertisement

बेस्टचा आंदोलनाचा इशारा, अत्यावश्यक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता

काही दिवसांअगोदर समितीतर्फे कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास 'घरी राहा, सुरक्षित राहा', असे लॉकडाऊनचं आवाहन करणाऱ्या आंदोलनाचा इशारा दिला.

बेस्टचा आंदोलनाचा इशारा, अत्यावश्यक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता
SHARES

बेस्ट उपक्रमातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच, अपुऱ्या सोयीसुविधांच्या निषेधार्थ बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं आंदोलनाचा इशारा दिली होता. त्यानुसार, आंदोलन सुरू झालं आहे. मागील काही दिवसांअगोदर समितीतर्फे कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास 'घरी राहा, सुरक्षित राहा', असे लॉकडाऊनचं आवाहन करणाऱ्या आंदोलनाचा इशारा दिला. यावर बेस्ट प्रशासनानं रविवारी रात्री बेस्ट कामगार संघटनांशी उशिरापर्यंत कोणतीही चर्चा केली नसल्यानं तसंच, कामगार आंदोलनात सहभागी झाले, तरी एसटीच्या पर्यायी बससेवेनं सेवांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा केला जात आहे.

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचऱ्यांना वाहतूकसेवा देणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याचं प्रमाणं मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. कोरोनाने बाधित झालेल्या ८ कामगारांचा मृत्यू झाला असून, कोरोनाग्रस्त कामगारांची संख्या १२२ इतकी झाली आहे. कोरोनाशी लढताना बेस्ट कामगार अग्रभागी असतानाही त्यांना सुविधा पुरविल्या जात नसल्याची भूमिका घेत कृती समितीनं आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, त्यावर प्रशासनाकडून चर्चेचे पाऊल न उचलता सुमारे एक हजार एसटीची पर्यायी व्यवस्था करण्याचं काम प्रशासनातर्फे करण्यात आल्याचं समजतं.

दैनंदिन स्तरावर सरासरी बेस्टच्या १,५०० पर्यंत बस चालविल्या जातात. त्यासाठी ३ ते साडेतीन हजार चालक, वाहक कामावर येतात. या कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करत कृती समितीने आंदोलन जाहीर केले. त्याचवेळी, बेस्ट कामगारांना आवश्यक असलेल्या सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यातील असलेल्या कमतरता भरून काढण्याचे प्रयत्न सुरू असून, करोनाशी लढत असताना आंदोलनासारखे पाऊल उचलू नये, असे आवाहन बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, कार्याध्यक्ष अॅड. उदय आंबोणकर यांनी केले आहे.



हेही वाचा -

कोरोनामुळे कला विश्वातील 'रत्न' हरपले, ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं निधन

देशव्यापी लाॅकडाऊन ४.० लागू, काय सुरू, काय बंद? वाचा नवे नियम…



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा