Advertisement

महापालिकेकडून बेस्टला ६०० कोटी अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

बेस्ट उपक्रमाला पालिकेकडून ६०० कोटी रुपये अनुदान मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत सोमवारी अंतिम मंजुरी मिळाली.

महापालिकेकडून बेस्टला ६०० कोटी अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा
SHARES

बेस्ट उपक्रमाला पालिकेकडून ६०० कोटी रुपये अनुदान मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत सोमवारी अंतिम मंजुरी मिळाली आहे. मात्र यासाठी ठेवण्यात आलेल्या अटी शिथिल कराव्या, बेस्ट कारभारावर लक्ष ठेवावं, अशा सूचना सर्वपक्षीय सदस्यांनी या सभेत केल्या. त्यामळं पालिका यावर काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रस्तावाला मंजुरी

बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदत करण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत झाल्यानंतर पालिका प्रशासनानं ६०० कोटी रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मांडला. त्यानुसार १०० कोटी रुपयांचे पहिलं अनुदान मंजूरही करण्यात आलं. अटी व शर्थीचं पालन केल्यास उर्वरित अनुदान मिळेल, असं पालिकेनं बजावलं. याबाबतचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पालिका महासभेपुढे सोमवारी मांडण्यात आला होता.

किमान भाडं ५ रुपये

बेस्टचे प्रवासी भाडं किमान ५ रुपये असावं अशी मागणी सर्वपक्षीयांनी अनेक वेळा केली परंतु याकडं दुर्लक्ष करण्यात आलं, अशी नाराजी सर्वपक्षीय नगरसेवकांनी यावेळी व्यक्त केली. किमान भाडं ८ रुपयांवरून ५ रुपये करणं स्वागतार्ह आहे. मात्र ३ महिन्यांत बसगाड्यांचा ताफा ७ हजारांपर्यंत वाढविणे अशा अटी लादणे योग्य नाही. या अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी सदस्यांनी केली.

स्पेशल फिडर बस सेवा

बेस्ट उपक्रमाने रेल्वे, मेट्रो, मोनो रेल्वेच्या दोन स्थानकांमधील अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी फिडर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे महिला प्रवाशांसाठीही स्पेशल फिडर बस सेवा सुरू करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर व पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास महिला प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्याता आहे.



हेही वाचा -

मुख्यमंत्रीपदाबाबत माध्यमांशी तुम्ही बोलू नका- मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे

मराठी अनिवार्य करण्यासाठी एक महिन्यात वटहुकूम काढणार- मुख्यमंत्री



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा