Advertisement

मध्य मुंबईतील सातरस्ता जंक्शनचं सुशोभीकरण होणार

मध्य मुंबईत असलेल्या सातरस्ता या मोठ्या जंक्शनचं सुशोभिकरण करण्यात येणार आहे. याबाबत महापालिकेनं निर्णय घेतला.

मध्य मुंबईतील सातरस्ता जंक्शनचं सुशोभीकरण होणार
SHARES

मध्य मुंबईत असलेल्या सातरस्ता या मोठ्या जंक्शनचं सुशोभिकरण करण्यात येणार आहे. याबाबत महापालिकेनं निर्णय घेतला असून, महापालिकेच्या (bmc) जी दक्षिण विभागानं या भव्य वाहतूक बेटाला पादचाऱ्यांच्या सोयीनुसार विकसित करण्याचे ठरवलं आहे. याकरीता ८० लाखाचा खर्च अपेक्षित आहे. हे सुशोभीकरण ऑक्टोबपर्यंत पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

सात रस्ते जिथे एकत्र येऊन मिळतात अशी एकमेव ओळख असलेले ‘सातरस्ता सर्कल‘ आपली मूळ ओळख टिकवून लवकरच कात टाकणार आहे. महापालिकेच्या जी दक्षिण विभागाने वरळीतील वाहतूक बेटांचे सुशोभिकरण केल्यानंतर आता या भव्य जंक्शनचे सुशोभिकरण हाती घेतले आहे. केशवराव खाडय़े मार्ग, आनंदीलाल मार्ग, आर्थर रोड, मौलाना आझाद रोड, बाबूराव जगताप मार्ग, साने गुरुजी मार्ग, जी बाबू सकपाळ असे सात रस्ते जिथे येऊन मिळतात तो सातरस्ता म्हणजे पादचाऱ्यांना विशेषत: नवख्या मुंबईकरांना गोंधळात टाकणारा परिसरच आहे.

या परिसराचा कायापालट करण्याचे जी दक्षिण विभागाने ठरवले आहे. या ठिकाणी येणाऱ्या पादचाऱ्यांना रस्ता ओलांडायचा असेल तर गोलाकार फिरून जावे लागते. रस्ता ओलांडताना अनेकदा ते धोक्याचे असते. त्यामुळे या वाहतूक बेटामध्ये पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी खास सोय करण्यात येणार आहे. तसेच अंध व्यक्तींच्या सोयीच्यादुष्टीनेही बदल करण्यात येणार आहे.

वाहतूक बेटामध्ये खास पुरातन दिवे,  उद्यान, चालणाऱ्यांसाठी छोटा पदपथ व पदपथाच्या कडेने बसण्याची व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी बसण्याची व्यवस्थाही यात असणार आहे. तसेच महालक्ष्मी पूलापासून ते बाबूराव जगताप मार्गाला जोडणारा पदपथ हे देखील या सुशोभीकरणाचा भाग असणार आहे.

या संपूर्ण कामाचे रेखांकन ‘रचना संसद‘ या शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केले असून या कामाचा खर्च नगर विकास विभाग आणि पालिका उचलणार असल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा

वसई-विरार पालिकेनं राबवली डोर टू डोर मोहीम

COVID-19 Second Wave: मे मध्ये ० ते १८ वयोगटातील फक्त ०.०७% मुलांना कोरोनाचा संसर्ग


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा