Advertisement

मध्य रेल्वेची फुकट्या प्रवाशांकडून १४३ कोटींची दंडवसुली


मध्य रेल्वेची फुकट्या प्रवाशांकडून १४३ कोटींची दंडवसुली
SHARES

मध्य रेल्वेने एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ मध्ये फुकट्या प्रवाशांना चांगलाच दणका दिला आहे. फुकट्या प्रवाशांना धाक बसावा म्हणून मध्य आणि पश्चिम रेल्वेने मोहिम राबवली आहे. याच मोहिमेत विनातिकीट आणि बेकायदेशीर सामानाची वाहतूक करणाऱ्या प्रवाशांकडून एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ मध्ये १४३ कोटी २१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.


किती गुन्ह्यांची नोंद?

मध्य रेल्वेवर फेब्रुवारी २०१८ मध्ये फुकट्या प्रवाशांविरोधात २.५५ लाख गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यांच्याकडून १२ कोटी ७७ लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्यावर्षी २०१७ मध्ये १.९७ लाख गुन्ह्यांची नोंद झाली असून १२ कोटी ७७ लाख एवढाच दंड वसूल केला करण्यात आला होता.


दंडाच्या रकमेत वाढ

दरम्यान, यावर्षी २९.४९ टक्क्यांनी रकमेत वाढ झाली आहे. तर, एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या महिन्यांमध्ये फुकट्या प्रवाशांविरोधात २९ लाख १२ हजार गुन्ह्यांची नोंद झाली असून यामधून १४३ कोटी २१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्यावर्षी या महिन्यामध्ये २४ लाख ६१ हजार गुन्ह्यांची नोंद झाली असून या दंडाच्या रक्कमेत यावर्षी १८.३५ टक्क्यांने वाढ झाली आहे.

यावरून वारंवार आवाहन करुनही मध्य आणि पश्चिम रेल्वेवर फुकट्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याचं दिसत आहे. त्यासाठी विनातिकीट प्रवास करू नये, हा एक दंडनीय अपराध आहे, असं आवाहन वारंवार मध्य रेल्वे प्रशासन करत आहे.



हेही वाचा-

बोरीवली स्थानकातील 'हा' पादचारी पूल ३० मार्चपर्यंत बंद

अाता पश्चिम रेल्वेवरील लोकलही होणार गारेगार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा