Advertisement

नालेसफाई पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात लोकल वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता


नालेसफाई पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात लोकल वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता
SHARES

यंदा मुंबईत मान्सून वेळेवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी साचून रेल्वे ठप्प होणे टाळण्यासाठी प्रशासनाने उर्वरित कामे वेगाने पूर्ण करणे गरजेचे आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामे ९० टक्के झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्ष चित्र वेगळेच असल्याचे वास्तव आहे. वांद्रे टर्मिनस पूर्वेला चमडावाडी नाला आहे. रेल्वेच्या जागेत स्थानिक राजकारण्यांच्या मदतीने अतिक्रमण करून बहुमजली झोपड्या येथे उभ्या राहिल्या आहेत. यांमुळे या परिसरात प्रचंड अस्वच्छता आहे.

खार, पाली हिल, वांद्रे यार्ड, वांद्र टर्मिनस येथील सांडपाणी या नाल्यातून वाहून नेले जाते. पश्चिम उपनगरातील पुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी इथं सफाई होणे गरजेचे आहे. मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील २४७ किमी नाल्यापैकी २३० किमीचा नाला साफ करण्यात आला आहे. ८३३ कल्वहर्टपैकी ८०० कल्वहर्टची सफाई पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर पाणी साचण्याच्या ठिकाणी उच्च क्षमतेचे पाणी उपसा करणारे पंपही बसविण्यात आले आहेत.

पश्चिम रेल्वेवरील मुंबई विभागातील ९० टक्के मान्सूनपूर्वकामे पूर्ण झाली आहेत. गेल्या वर्षी दादर-माटुंगा परिसरात पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली होती. यंदा त्या ठिकाणी कल्वहर्टची दुरुस्ती करून पाणी निचरा होण्याची क्षमता वाढवण्यात आली. वांद्रे परिसरातील मायक्रोटनलिंगचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. रेल्वे हद्दीतील कल्वहर्ट पालिकेच्या कल्वहर्टला मिळतात. यामुळे पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी दोन्ही ठिकाणांची कल्वहर्टची सफाई होणे गरजेचे असते.

मुंबई रेल्वेच्या पूर स्थितीला कारण ठरणाऱ्या धारावी आणि चमडावाला नाल्याची सफाई प्राथमिकतेने करावी, अशी विनंती रेल्वेने महापालिकेला केली आहे.

रेल्वे आणि महापालिका यांच्यातील हद्दीतील कामे अर्धवट राहू नये, यासाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी हे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या थेट संपर्कात आहेत. पाणी साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांवरील पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासाठी एकत्रित काम करत आहे, असेही रेल्वे प्रशानाकडून सांगण्यात आले.




हेही वाचा - 

गुड न्यूज! १ जूननंतर लाॅकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता येणार

  1. आरोग्य सेतूवर आले 'हे' नवीन फिचर, 'असे' ठरेल फायदेशीर
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा