Advertisement

ड्रायव्हिंग लायसन्सला आधार जोडणं बंधनकारक

यापूर्वी आयकर परतावा, पॅन कार्ड आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार बंधनकारक करण्यात आलं आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्सला आधार कार्ड संलग्न करणं गरजेचं आहे. यासाठी लवकरच एक कायदा आणण्यात येणार आहे.

ड्रायव्हिंग लायसन्सला आधार जोडणं बंधनकारक
SHARES

अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारनं आधार कार्ड अनिवार्य केलं आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्सलादेखील आधार कार्ड संलग्न करणं अनिवार्य आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. बनावट परवाने घेणाऱ्यांना  लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारनं हे पाऊल उचललं आहे.


गैरप्रकार रोखण्यासाठी

यापूर्वी आयकर परतावा, पॅन कार्ड आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार बंधनकारक करण्यात आलं आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्सला आधार कार्ड संलग्न करणं गरजेचं आहे. यासाठी लवकरच एक कायदा आणण्यात येणार आहे. या कायद्याच्या मदतीनं ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी लिंक करू शकता.


डुप्लिकेट परवाना नाही

एखादा अपघात झाल्यानंतर दोषी व्यक्ती पळून जातो आणि नंतर डुप्लिकेट परवाना मिळवतो. यामुळे त्याला सहीसलामत सुटून जाणं शक्य होतं. मात्र, परवान्याला आधार कार्ड संलग्न केल्यास तुम्ही तुमचे नाव बदलू शकता. परंतु डोळ्यांची बुबुळे किंवा बोटांचे ठसे असे बायोमॅट्रिक्स बदलू शकत नाहीत. त्यामुळे डुप्लिकेट लायसन्स घेण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला डुप्लिकेट लायसन्स मिळू शकत नाही, अशी माहिती रविशंकर प्रसाद यांनी दिली.


हेही वाचा

ड्राइव्हिंगचे हे नवे नियम प्रत्येकाला माहिती पाहिजेत

सोमवारी रात्रीपासून ३० हजार बेस्ट कर्मचारी संपावर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा