Advertisement

मध्य रेल्वेच्या मुंबई-शिर्डी मार्गावर 'ट्रेन १८' धावणार?

मध्य रेल्वेची ट्रेन १८ गाडीसुद्धा मुंबई-शिर्डी मार्गावर धावण्याची शक्यता आहे. ही ट्रेन सुरु झाल्यास मुंबईहून शिर्डीला जाण्यासाठी ३ तास लागण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई-शिर्डी मार्गावर 'ट्रेन १८' धावणार?
SHARES

दरवर्षी अनेक जण साई-बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जात असतात. मुंबईहून शिर्डीला जाण्यासाठी एसटी बसपासून अनेक खासगी गाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. अशातचं आता, मध्य रेल्वेची ट्रेन १८ गाडीसुद्धा मुंबई-शिर्डी मार्गावर धावण्याची शक्यता आहे. ही ट्रेन सुरु झाल्यास मुंबईहून शिर्डीला जाण्यासाठी ३ तास लागण्याची शक्यता आहे. सध्यस्थितीत मुंबईहून शिर्डीला जाण्यासाठी ८ ते ९ तास लागतात. त्यामुळं ही ट्रेन सुरू झाल्यास मुंबईकरांना कमी वेळात शिर्डीला पोहोचता येणार आहे.

३ तासांत शिर्डीत

रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मध्य रेल्वे प्रशासनासोबत याबाबत चर्चा केली असून, या चर्चेनंतर 'ट्रेन १८'साठी मुंबई-शिर्डी मार्ग ठरविण्यात आला आहे. लवकरच या ट्रेनसाठीच्या अंतिम मार्गाचा निर्णय घेण्यात येणार आहे. यासंदर्भात, या महिन्याच्या सुरूवातीला मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची एक बैठक झाली होती. या बैठकीदरम्यान सेमी हाय-स्पीड ट्रेन सकाळी मुंबईहून शिर्डीसाठी रवाना होईल आणि ३ तासांत शिर्डीला पोहोचेल. तसंच, त्याचदिवशी ही ट्रेन शिर्डीवरून मुंबईसाठी रवाना होणार असल्याचं प्रस्तावित करण्यात आलं आहे.

प्रवाशांना दिलासा

मुंबई-शिर्डी मार्गावर ट्रेन १८ ही ट्रेन सुरु झाल्यास अनेक प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. त्याशिवाय, प्रवाशांचा प्रवास वेळी कमी होणार असून एका दिवसात भाविकांना साई-बाबांच दर्शन घेणं शक्य होणार आहे. त्यामुळं आता ही ट्रेन या मार्गावर सुरू होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

पाणी जपून वापरा; तलावांमध्ये २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

३ ते ६ महिन्यांत मुंबईत पूल बांधले जाणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा