Advertisement

एसी लोकलचा प्रवास होणार स्वस्त?

एसी लोकलचा प्रवास हा प्रवास स्वस्त हवा, अशी मागणी ९० टक्के प्रवाशांनी मध्य रेल्वेकडं केली आहे.

एसी लोकलचा प्रवास होणार स्वस्त?
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासादरम्यान अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. त्यातच आता भर म्हणजे एसी लोकलमुळं प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. एसी लोकलच प्रवास हा महागडा आहे. त्यामुळं एसी लोकलचा प्रवास हा प्रवास स्वस्त हवा, अशी मागणी ९० टक्के प्रवाशांनी मध्य रेल्वेकडं केली आहे.

मध्य रेल्वेनं नुकतेच ट्रान्स हार्बरवर सुरू असलेल्या एसी लोकलमधील प्रवासी सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात प्रवाशांची मागणी पाहता त्यानुसार, भाडे कमी करण्यावर भर दिल्याची माहिती समोर येत आहे. त्याचाच आधार घेऊन रेल्वे बोर्डाकडे चर्चाही सुरू आहे. ट्रान्स हार्बरवरील लोकलचे भाडे कमी झाल्यास पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलचेही भाडेदरही कमी करणं भागच असल्याचं समजतं.

ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर एसी लोकल दाखल झाली. या लोकलच्या दिवसाला १६ फेऱ्या होतात. एका एसी लोकलची प्रवासी क्षमता ५ हजार एवढी आहे. मात्र, एका लोकल फेरीतून दिवसाला सरासरी ९० प्रवासी प्रवास करतात. एकूण फेऱ्यांमधून १४०० ते १५०० प्रवासी प्रवास करत असल्याचं सांगण्यात आले. प्रवाशांमध्ये तिकीटधारकांबरोबरच पासधारकांचाही समावेश आहे.

तिकीट तपासणीसांमार्फत केलेल्या ३ दिवसांच्या सर्वेक्षणात सर्व फेऱ्यांमधील प्रवाशांची मत, सूचना घेण्यात आली. यामध्ये ९० टक्केपेक्षा जास्त प्रवाशांनी एसी लोकलचं भाडं कमी हवं, असे मत नोंदविण्यात आलं आहे. प्रथम श्रेणीचा प्रवास परवडणारा आहे. मात्र त्यापेक्षाही अधिक एसीचा लोकलचा प्रवास असल्याचं प्रवाशांचं म्हणणं असल्याचं समजतं. त्यामुळं कमी भाडं ठेवून प्रवाशांना चांगल्या सेवेचा लाभ मिळू द्या, अशी मागणी केली आहे.

या सर्वेक्षणाचा आधार घेऊनच मध्य रेल्वे भाडेदर कमी करण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडं चर्चा करत आहे. नुकताच तसा प्रस्तावही बोर्डाकडे पाठवला आहे. यापूर्वी भाडे कमी करण्यासंदर्भात पश्चिम रेल्वेनं रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र त्याचा विचार करण्यात आला नाही. आता ट्रान्स हार्बरवरील लोकल गाडीलाही कमी मिळत असलेला प्रतिसाद आणि प्रवाशांची मागणी पाहता रेल्वे बोर्ड त्याचा विचार करण्याची शक्यता आहे.

प्रवाशांच्या सूचना

  • संपूर्ण एसी लोकल चालवण्यापेक्षा अर्ध वातानुकूलित लोकल चालवा. यात एक ते तीन डबे वातानुकूलित करण्याचाच विचार करा.
  • सामान्य लोकलप्रमाणेच वातानुकूलित लोकलमध्ये दिव्यांगासाठी एक स्वतंत्र डबा किंवा जागा हवी.
  • वातानुकूलितचे भाडेदर पाहता सामान्य लोकलमधील प्रथम श्रेणीप्रमाणेच त्या लोकलमधेही आसनव्यवस्था उत्तम असावी.

हेही वाचा -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने सभा, बैठका केल्या रद्द

Coronavirus: शालेय विद्यार्थ्यांना सॅनिटायजर आणण्याची सूचना



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा