Advertisement

हिमालय पूलाच्या दुर्घटनेनंतर ३० पादचारी पुलांची तातडीने दुरुस्ती

छत्रपती शिवाजी महाराज (सीएसएमटी) स्थानकाबाहेरील हिमालय पादचारी पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला, तर ३१ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर जाग आलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने मार्गांवरील ३० पादचारी पूल आणि उड्डाणपुलांची तातडीने दुरुस्ती करण्याचं ठरवलं आहे.

हिमालय पूलाच्या दुर्घटनेनंतर ३० पादचारी पुलांची तातडीने दुरुस्ती
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज (सीएसएमटी) स्थानकाबाहेरील हिमालय पादचारी पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला, तर ३१ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर जाग आलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने मार्गांवरील ३० पादचारी पूल आणि उड्डाणपुलांची तातडीने दुरुस्ती करण्याचं ठरवलं आहे.


पुलांची सुरक्षा तपासणी

मागील वर्षी अंधेरी स्थानकातील गोखले पूल दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पादचारी पूल, उड्डाणपूल यांसह अन्य पुलांची सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रेल्वे, मुंबई महापालिका, मुंबई आयआयटीने संयुक्तरीत्या सर्वेक्षण करून या सर्वेक्षणाचा अहवाल देखील सादर केला होता. 


पश्चिम रेल्वेची पाहणी

पश्चिम रेल्वेने ११५ पादचारी पूल व २९ उड्डाणपुलांची पाहणी केली आहे. यामध्ये २८ उड्डाणपूल सुरक्षित असून लोअर परळ स्थानकाबाहेरील पूल असुरक्षित असल्याचं समजताच त्या पुलाच्या पुनर्बांधणीला सुरूवात करण्यात आली. तसंच, वांद्रे कलानगर, अंधेरी, माहिम, वसई, मालाड येथील उड्डाणपुलांची आणि पादचारी मार्गिकेची दुरुस्ती जुलै महिन्यापर्यंत करण्यात येणार आहे. त्याशिवाय चर्नी रोड, ग्रॅंटरोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, प्रभादेवी, दादर, खार, विलेपार्ले, गोरेगाव, मालाड स्थानकांतील पादचारी पुलांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसंच, पश्चिम रेल्वेवर ४ स्थानकांत नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत.


मध्य रेल्वेची पाहणी

मध्य रेल्वेने ८९ उड्डाणपुलांपैकी ८१ पुलांची पाहणी केली आहे. तसंच, १९१ पैकी १७८ पादचारी पूल आणि १९ अन्य पुलांपैकी १७ पुलांची पाहणी केली आहे. दरम्यान, १७८ पादचारी पुलांपैकी मुंब्रा स्थानकातील पादचारी पूल असुरक्षित असून हा पूल पाडण्यात आला. त्याचप्रमाणं १० पुलांची किरकोळ दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामध्ये कुर्ला, विक्रोळी, भांडुप, कल्याण यासह अन्य स्थानकांचा समावेश आहे.



हेही वाचा -

माधुरी पवार बनली महाराष्ट्राची पहिली अप्सरा

पूल दुर्घटनेला मुंबईची गर्दी जबाबदार; ‘सामना’तून मुंबईकरांवरच खापर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा