Advertisement

मशीद पुलाचं पाडकाम अर्धातास अगोदर पूर्ण, मात्र प्रवाशांचे हाल

मशीन पुलाचे पाडकाम अपेक्षित वेळेच्या अर्धा तास आधीच म्हणजे संध्याकाळी ४.०६ वाजता पूर्ण करण्यात आलं. असं असलं, तरी मेगाब्लॉकच्या वेळेत मध्य आणि हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते वडाळा आणि मशिद, सँडहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान लोकल सेवा नसल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोर जावं लागलं.

मशीद पुलाचं पाडकाम अर्धातास अगोदर पूर्ण, मात्र प्रवाशांचे हाल
SHARES

कल्याणचा पत्री पूल पाडल्यानंतर मध्य रेल्वेने रविवारी विशेष ब्लॉक घेऊन मशिद स्थानकातील जुना पूल यशस्वीरित्या पाडला. सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला होता. परंतु, पुलाचे पाडकाम अपेक्षित वेळेच्या अर्धा तास आधीच म्हणजे संध्याकाळी ४.०६ वाजता पूर्ण करण्यात आलं. असं असलं, तरी मेगाब्लॉकच्या वेळेत मध्य आणि हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते वडाळा आणि मशिद, सँडहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान लोकल सेवा नसल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोर जावं लागलं.


पूल का पाडला?

मशिद स्थानकातील जुना पूल धोकादायक झाल्याने हा पूल पाडून त्याजागी नवीन पूल बांधण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या जुन्या पुलाची लांबी २.४४ मीटर होती, ती वाढवून ४.८८ मीटर इतकी केली जाणार आहे. एका बाजूच्या २.४४ मीटरच्या जिन्यांची रुंदी वाढवून ती ३.६६ मीटरपर्यंत केली जाणार आहे.

पाडलेल्या जुन्या पुलाचं वजन २५ टन इतकं होते. हा पूल पाडण्यासाठी १४० टन क्षमतेची क्रेन वापरण्यात आली असून संपूर्ण मार्गावरील ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला होता.


प्रवाशांचे हाल

या पुलाच्या पाडकामासाठी स. १०.३० पासून घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. आधीच ब्लॉकदरम्यान कमी लोकल धावतात. त्यामध्ये मशिद, सँडहर्स्ट रोड आणि सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत सेवा बंद ठेवल्यामुळे प्रवाशांच्या हालात भर पडली.


खिशाला कात्री

भायखळा ते सीएसएमटी दरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक बंद होती, तर वडाळा रोड ते सीएसएमटी या मार्गावरील पूर्ण वाहतूक ठप्प होती. त्यामुळे वडाळा रोड इथून सीएसएमटीकडे जाण्यासाठी प्रवाशांना बेस्टनं व टॅक्सीनं प्रवासा करावा लागला. रस्ते मार्गाने प्रवास करावा लागल्याने रविवार सुटीचा दिवस साधून कुटुंबीयांसोबत घराबाहेर पडलेल्या प्रवाशांच्या खिशाला बऱ्यापैकी कात्री लागली.हेही वाचा-

नव्या एसी लोकलसाठी आणखी प्रतीक्षा!

वर्सोवा पूल अवजड वाहतुकीस महिनाभर बंदसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा