नव्या एसी लोकलसाठी आणखी प्रतीक्षा!

मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MTUP-3)च्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत एसी लोकलची खरेदी करण्यात येणार होती. परंतु इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) या देशातील सर्वात मोठ्या ट्रेन कोच उत्पादक कंपनीने २३ नोव्हेंबरला एसी लोकल खरेदीची निविदा रद्द केली.

SHARE

नव्या एसी लोकलसाठी मुंबईकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. २०२० पर्यंत आणखी ४७ एसी लोकल सेवेत दाखल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MTUP-3)च्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत एसी लोकलची खरेदी करण्यात येणार होती. परंतु इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) या देशातील सर्वात मोठ्या ट्रेन कोच उत्पादक कंपनीने २३ नोव्हेंबरला एसी लोकल खरेदीची निविदा रद्द केली. त्यामुळे कोच खरेदीसाठी आणखी ६ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.


निविदा रद्द करण्याचं कारण

रेल्वेच्या रिसर्च डिझाईन अॅण्ड स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन (RDSO) ने या एसी लोकलच्या कोचच्या संदर्भात काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केल्यामुळे ही निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं स्पष्टीकरण 'आसीएफ'कडून देण्यात आलं आहे. या सर्व एसी लोकल २०२० अखेरपर्यंत खरेदी करण्याची रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न होता. परंतु आता यासाठी ६ महिन्यांचा अतिरिक्त कालावधी लागू शकतो. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर 'आयसीएफ' काेचच्या खरेदीसाठी पुन्हा एकदा निविदा काढणार आहे.

सद्यस्थितीत एका एसी लोकलच्या माध्यमातून चर्चगेट आणि विरार स्थानकादरम्यान १२ सेवा चालवल्या जात आहेत. तर नव्याने सेवेत दाखल होणाऱ्या या एसी लोकल मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार आहेत.हेही वाचा-

मुंबईतील सर्व लोकल होणार १५ डब्यांच्या!

गोरेगाव-पनवेल थेट लोकल सेवेला मुहूर्त कधी?संबंधित विषय
ताज्या बातम्या