Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

नाशिक-कल्याण लोकलची येत्या १५ दिवसांत चाचणी

येत्या १५ दिवसांत नाशिक-मुंबई लोकल सेवेच्या चाचणीला सुरु होणार आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्यास कल्याण ते नाशिकरोड लोकल सुरु होणार आहे.

नाशिक-कल्याण लोकलची येत्या १५ दिवसांत चाचणी
SHARES

नाशिक-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेनं खूशखबर दिली आहे. कारण, येत्या १५ दिवसांत नाशिक-मुंबई लोकल सेवेच्या चाचणीला सुरु होणार आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्यास कल्याण ते नाशिकरोड लोकल सुरु होणार आहे. यावेळी राजधानी एक्स्प्रेस मनमाडमार्गे धावेल.


लोकल सेवेची मागणी

नोकरी-व्यवसायानिमित्त हजारो प्रवासी दरराेज मुंबई ते नाशिक असा प्रवास करतात. नाशिक-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पंचवटी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस अशा केवळ २-४र एक्स्प्रेसने प्रवास कारावा लागतो. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक-मुंबई प्रवासासाठी लोकल सेवा सुरु करण्याची मागणी केली जात होती. मात्र, नाशिक-मुंबई या मार्गात असलेल्या कसारा घाटात या लोकल सेवेसाठी अडचण येत होती.  


चाचणीकडे लक्ष

त्यानुसार मध्य रेल्वेने नाशिक-मुंबई लोकल सेवेची १५ दिवसांत चाचणी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ही चाचणी यशस्वी ठरली तर, पुढील काही दिवसांतच नाशिक-मुंबई लोकल सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नाशिक-मुंबई प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचे लक्ष आता या चाचणीकडे लागले आहे.


हेही वाचा-


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा