मध्य रेल्वेच्या ५२ उन्हाळी 'स्पेशल ट्रेन्स'


SHARE

मध्य रेल्वेकडून उन्हाळी स्पेशल ट्रेन्सची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. लोकमान्‍य टिळक टर्मिनस ते वाराणसी दरम्‍यान ५२ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. एप्रिल ते जून अशा या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.


'एलटीटी' ते वाराणसी २६ साप्‍ताहिक ट्रेन्स

  • ०११०१ ही विशेष गाडी लोकमान्‍य टिळक टर्मिनसहून ०२ एप्रिल ते २५ जूनपर्यंत प्रत्येक रविवारी मध्यरात्री ००.४५ वाजता सोडण्यात येणार आहे. जी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी वाराणसीला पोहोचेल. या गाडीच्या १३ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
  • तर, ०११०२ ही विशेष गाडी वाराणसीहून ३ मार्च ते २६ जूनपर्यंत प्रत्येक मंगळवारी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी निघणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसवर दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी आगमन होईल.
  • इथं असणार थांबे- कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर आणि छियोकी जंक्शन.
  • या ट्रेनला २ एसी थ्री टियर, ४ स्लीपर कोच आणि ८ जनरल कोच असतील.


'एलटीटी' ते वाराणसी २६ साप्‍ताहिक ट्रेन्स

  • ०११६९ ही विशेष गाडी लोकमान्‍य टिळक टर्मिनसहून ५ मार्च ते २८ ऑगस्टपर्यंत प्रत्येक गुरुवारी सकाळी ११.३० वाजता निघणार आहे. ती दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४० वाजता वाराणसीला पोहोचेल. या गाडीच्या १३ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
  • ०११७० ही विशेष गाडी वाराणसीहून ६ मार्च ते २९ ऑगस्टपर्यंत प्रत्‍येक शुक्रवारी सकाळी ५.२० वाजता निघणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ ला लोकमान्‍य टिळक टर्मिनस इथं पोहोचेल.
  • इथं असणार थांबे- कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर आणि छियोकी जंक्शन.
  • या ट्रेनला २ एसी थ्री टियर, ४ स्लीपर कोच आणि ८ जनरल कोच असेल.
संबंधित विषय