गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी १६६ विशेष गाड्या

दरवर्षीप्रमाणं यंदाही गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानिमित्त १६६ विशेष फेऱ्या चालविण्यात येणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेनं शुक्रवारी केली.

SHARE

दरवर्षीप्रमाणं यंदाही गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानिमित्त १६६ विशेष फेऱ्या चालविण्यात येणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेनं शुक्रवारी केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल या स्थानकांतून विशेष धावणार असून २५ मे पासून विशेष गाड्यांचं आरक्षण खुलं होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.


मुंबई ते सावंतवाडी (२६ फेऱ्या)

२८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत गाडी क्रमांक ०१००१ ही गाडी सीएसएमटीतून मध्यरात्री १२.२० वाजता सुटणार असून सावंतवाडीला दुपारी २.१० वाजता पोहोचणार आहे. तसंच, गाडी क्रमांक ०१००२ ही गाडी त्याच दिवशी दुपारी ३ वाजता सावंतवाडीहून सुटणार असून पहाटे ३.४० वाजता सीएमएमटीला पोहोचणार आहे.

मुंबई ते सावंतवाडी (१२ फेऱ्या)

२९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधील दर गुरुवार आणि शनिवार गाडी क्रमांक ०१००७ ही मुंबई ते सावंतवाडी गाडी दर गुरुवारी आणि शनिवारी सीएसएमटीतून मध्यरात्री १२.२० वाजता सुटणार असून सावंतवाडीला दुपारी २.१० वाजता पोहोचणार आहे. तसंच, गाडी क्रमांक ०१००८ ही गाडी त्याच दिवशी ३ वाजता सावंतवाडीहून सुटणार असून, सीएसएमटीला पहाटे ३.४० वाजता पोहचणार आहे.

मुंबई-रत्नागिरी-पनवेल (४० फेऱ्या)

२८ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या कालावधीत गाडी क्रमांक ०१०३३ ही मुंबई-रत्नागिरी गाडी सीएसएमटीहून सकाळी ११.३० वाजता सुटणार असून, रत्नागिरीला रात्री १० वाजता पोहचणार आहे. तसंच, गाडी क्रमांक ०१०३४ त्याच दिवशी रत्नागिरीहून रात्री १०.५० वाजता सुटणार आहे.


पनवेल-सावंतवाडी-मुंबई (४० फेऱ्या)

२९ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत गाडी क्रमांक ०१०३५ ही गाडी पनवेलहून सकाळी ७.५० वाजता सुटणार असून, सावंतवाडीला रात्री १० वाजता पोहोचणार आहे. तसंच, गाडी क्रमांक ०१०३६ हा गाडी सावंतवाडीहून रात्री ११ वाजता सुटणार असून, मुंबईत दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता पोहोचणार आहे.

विशेष फेऱ्या

त्याशिवाय, लोकमान्य टिळक टर्मिनस ते पेरणे (६ फेऱ्या), लोकमान्य टिळक टर्मिनस ते झाराप (६ फेऱ्या), लोकमान्य टिळक टर्मिनस-झाराप-पनवेल (८ फेऱ्या), पनवेल-सावंतवाडी (८ फेऱ्या), पनवेल-थिवीम (८ फेऱ्या), पुणे-रत्नागिरी व्हाया कर्जत-पनवेल (सहा फेऱ्या), पुणे-करमाळी (२ फेऱ्या) आणि पनवेल-सावंतवाडी या विशेष फेऱ्याही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.हेही वाचा -

'परे'वर आज रात्री तर मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लक

'मेट्रो-३' च्या १.२४ किलोमीटर अंतराचं भुयारीकरण पूर्णसंबंधित विषय