Advertisement

'चलो' फिर! आता बेस्ट प्रवासात कागदी तिकीट बंधनकारक नाही

बेस्टच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या सुमारे २६ लाख असून त्यातील ५ लाख २५ हजार प्रवाशांनी चलो अ‍ॅप डाऊनलोड केले आहे.

'चलो' फिर! आता बेस्ट प्रवासात कागदी तिकीट बंधनकारक नाही
SHARES

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता बेस्टनं प्रवास करताना ‘चलो’ अ‍ॅपच्या माध्यमातून तिकीट घेतल्यानंतर आता कागदी तिकीट किंवा त्याची प्रत घेणे बंधनकारक नसल्याचं स्पष्ट बेस्ट उपक्रमानं  केले आहे.

बेस्टच्या ‘चलो’ अ‍ॅपच्या माध्यमातून तिकीट काढल्यास प्रवाशांना मोबाइलवर दाखवलेले तिकीट ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही सुविधा १४ फेब्रुवारीपासून उपलब्ध केली जात असल्याची माहिती उपक्रमाने दिली.

मोबाइलद्वारे ‘चलो अ‍ॅप’ची सुविधा आणल्यानंतरही प्रवाशांना वाहकाकडून कागदी तिकीट घ्यावे लागत होते. त्याचा मनस्ताप प्रवासी व वाहकांना होत होता. ही अडचण दूर करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला.

प्रवाशांनी अ‍ॅपवरून तिकीट घेतल्यास ते तिकीट प्रवाशांच्या मोबाइलवरच दिसेल. केवळ तिकीटच नव्हे तर पासबाबतही त्याच पद्धतीचा अवलंब केला गेला आहे.

बेस्टच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या सुमारे २६ लाख असून त्यातील ५ लाख २५ हजार प्रवाशांनी चलो अ‍ॅप डाऊनलोड केले आहे.  अ‍ॅपमध्ये मोबाइल वॉलेटमधून किंवा कार्डमधील रकमेच्या साहाय्याने तिकीट विकत घेण्याची सुविधा आहे. 

बेस्ट प्रवासाचे ऑनलाइन तिकीट, बस पास घेतल्यानंतर प्रवाशांना मोबाइल स्क्रीनवरील तिकीट आणि पास वाहकांना दाखविणे आवश्यक आहे.  वाहक त्याची तिकीट यंत्रात नोंद घेणार आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा