Advertisement

मुंबई-हावडा मेलचे तीन डबे घसरले , १२ ट्रेन रद्द


मुंबई-हावडा मेलचे तीन डबे घसरले , १२ ट्रेन रद्द
SHARES

मुंबईवरून हावडाला जाणाऱ्या मुंबई-हावडा मेलचे तीन डबे इगतपुरी स्थानकाजवळ अाज रेल्वे रुळावरून घसरले. रविवारी पहाटे ही घटना घडली असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेनंतर जवळपास पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेससह १२ गाड्या रद्द करण्यात अाल्या अाहेत.


घसरलेले डबे रूळावरून काढले

रेल्वे प्रशासनानं मोठ्या प्रयत्नांअंती घसरलेले डबे रूळावरून बाजूला काढले अाहेत. रेल्वे प्रशासनानं मुंबईकडे जाणारी अप लाईन मोकळी केली असून या मार्गावरील काही गाड्या धीम्या गतीने सुरू अाहेत. डाऊन लाइन अद्यापही सुरू झाली नसून उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या जागच्या जागी थांबून अाहेत. रेल्वे प्रशासनानं खोळंबलेल्या गाडीतील प्रवाशांसाठी चहा, नाश्त्याची सोय केली अाहे.


प्रवाशांचे हाल

रविवारी पहाटे ही घटना घडल्यामुळे अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात अाल्या अाहेत तर काही गाड्या जागच्या जागी खोळंबल्या अाहेत. त्यामुळे दिल्ली, उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत अाहेत. काही गाड्यांचे मार्ग बदलून त्या पुणेमार्गे सोडण्यात अाल्या अाहेत.


हेही वाचा -

रेल्वे प्रवासात मर्यादेपेक्षा जास्त सामान न्या ; रेल्वेने निर्णय घेतला मागे

पावसाळ्यात कोकण रेल्वेचा वेग मंदावणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा