Advertisement

रेल्वे प्रवासात मर्यादेपेक्षा जास्त सामान न्या ; रेल्वेने निर्णय घेतला मागे


रेल्वे प्रवासात मर्यादेपेक्षा जास्त सामान न्या ;  रेल्वेने निर्णय घेतला मागे
SHARES

रेल्वेतून प्रवास करताना मर्यादेपेक्षा जास्त सामान नेल्यास सहापट दंड भरावा लागणार असल्याचा निर्णय रेल्वेने नुकताच घेतला होता. मात्र, आता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला अाहे. हा निर्णय प्रवाशांमध्ये याबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी घेण्यात आला होता, असं रेल्वे प्रशासनानं सागितलं आहे. त्यामुळं आता रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांना मर्यादेपेक्षा जास्त सामान नेता येणार आहे.

प्रत्येक प्रवासी रेल्वेतून प्रवास करताना आपल्यासोबत मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन जातो. त्यामुळे रेल्वेतील इतर प्रवाशांना त्याचा त्रास होतो. यासाठी रेल्वे प्रशासनाने १ जून ते ६ जूनपर्यंत एक अभियान सुरू केलं होतं.


सामानाची वाहतूक नियमबाह्य

मेल/एक्सप्रेसमध्ये प्रत्येक कोचनुसार सोबत नेण्याच्या सामानाचं वजन निश्चित करण्यात आलं आहे. त्यात कमाल वजनापर्यंत सूट दिली आहे. मर्यादेपेक्षा जास्त वजन आढळल्यास अतिरिक्त शुल्क रेल्वेकडून आकारला जातो. पण, अनेकदा प्रवासी लगेच चार्ज न भरताच नियमबाह्य पद्धतीने सामानाची वाहतूक करत असतात.


एसी पहिल्या वर्गासाठी

प्रती प्रवासी ७० किलो वजनाची मर्यादा
अतिरिक्त १५ किलो वजनासाठी अतिरिक्त शुल्क आकारला जात नाही
अधिक सामान असल्यास अतिरिक्त शुल्क मोजावे लागते
कमाल १५० किलोंपेक्षा अधिक सामान नेता येत नाही


एसी टू-टायर स्लीपर

प्रती प्रवासी ६० किलोपर्यंत वजनाच्या सामानासाठी कोणतंही शुल्क नाही.
१०० किलोपर्यंतचं सामान जादा रक्कम आकारून नेता येतं.हेही वाचा - 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने प्रवाशांचे हाल

कामबंद आंदोलन कर्मचाऱ्यांच्या अंगलट, पोलिसांकडून धरपकड सुरू
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा