Advertisement

रिक्षा-टॅक्सी चालकांचीही होणार कोरोना चाचणी

मुंबईत रिक्षा, टॅक्सी चालकांचीही कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना मंगळवारी झालेल्या बैठकीत तशा सूचना दिल्या आहेत.

रिक्षा-टॅक्सी चालकांचीही होणार कोरोना चाचणी
SHARES

मुंबईत रिक्षा, टॅक्सी चालकांचीही कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना मंगळवारी झालेल्या बैठकीत तशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मुंबईतील विविध भागांत महापालिकेकडून चाचणीसाठी शिबीरे घेण्यात येतील. चालकांना कोरोना चाचणीची सक्ती करण्यात आली नसली तरी त्यांना चाचणीसाठी पुढे येण्याचं आवाहन मात्र महापालिकेनं केलं आहे.

सध्या मुंबईत कोरोना रुग्णसंख्या जरी कमी होत असली तरीही पालिकेनं जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर दिलाच आहे. त्यानुसार आता मुंबईत धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांचीही चाचणी केली जाणार आहे. चालक दिवसभरात अनेक प्रवाशांच्या संपर्कात येत असतात. घरी गेल्यानंतर पत्नी, मुलांच्याही संपर्कात येतात. त्यामुळं धोका न पत्करता त्यांची चाचणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळते. चालक बाधित आढळल्यानंतर तात्काळ कुटुंबीयांतील सदस्यांचीही चाचणी होणार आहे.

रिक्षा, टॅक्सी स्टॅण्ड, रेल्वे स्थानकाबाहेरील थांबे इथं कोरोना चाचणीसाठी शिबिरे घेतली जाणार असून चालकांना कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या संदर्भात विविध रिक्षा, टॅक्सी संघटनांनाही कल्पना दिली जाणार आहे. जास्तीत जास्त चालकांनी कोरोना चाचणी करावी, यासाठीही पालिके कडून प्रयत्न केलं जाणार आहेत.

एखादा चालक बाधित आढळल्यास त्याला तात्काळ रुग्णालय किंवा केरोना केंद्रात नेले जाईल. त्यासाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध केली जाणार आहे. सध्या मुंबईत दोन लाख रिक्षा आहे, तर टॅक्सींची संख्या सुमारे ४० हजार आहे. काही रिक्षा, टॅक्सी संघटनाही करोना चाचणीसाठी शिबिरे आयोजित करतात. परंतु त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे मुंबई पालिके कडून मोठय़ा संख्येने रिक्षा, टॅक्सी चालकांच्या चाचणीसाठी शिबिरे घेण्याचा निर्णय घेतला आहे.



हेही वाचा -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत

आता घरीच करा कोरोना चाचणी; वाचा कशी करायची?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा