Advertisement

वाढत्या कोरोनामुळं मुंबईतील परप्रांतीय पुन्हा घरच्या दिशेने

मुंबईतील वाढत्या कोरोनामुळं जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधांमुळं अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या गावची वाट धरली आहे.

वाढत्या कोरोनामुळं मुंबईतील परप्रांतीय पुन्हा घरच्या दिशेने
SHARES

मुंबईतील वाढत्या कोरोनामुळं जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधांमुळं अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या गावची वाट धरली आहे. मुंबईतून गावी परतणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे असून उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या पूर्ण क्षमतेने भरून जाताना दिसत आहेत. जागा आरक्षित केलेल्या प्रवाशांनाच रेल्वेतून प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे सध्या खासगी बस गाड्यांना मागणी वाढली असून उत्तर भारतातील काही राज्यांत जाणाऱ्या बस गाड्यांच्या तिकीट दरात वाढ झाली आहे.

नव्याने लागू झालेल्या कठोर निर्बंधांमुळे परराज्यांतील कामगारांनी पुन्हा एकदा परतीचा प्रवास सुरू केला आहे. सध्या रेल्वेमधून मर्यादित प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा आहे. आरक्षित जागेव्यतिरिक्त अतिरिक्त प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत नाही. त्यामुळे आता खासगी बस गाड्यांना मागणी वाढली आहे.

खासगी वाहतूकदारांनी तिकिटांचे दरही वाढवण्यास सुरुवात केली आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडे विचारणा होताना दिसत आहे. गुजरातमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक केल्यानं त्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींना समोरे जावे लागत आहे. गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना त्यासाठी राजस्थानमध्ये जाऊन तेथून गुजरातमध्ये जाण्याचा मार्गही काही प्रवाशांनी निवडला आहे.

एलटीटी रेल्वे स्थानकात जाणाऱ्या मजुरांची संख्या वाढत आहे. मुंबईतून उत्तर भारतात सुटणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या भरून जाताना दिसत आहेत. दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्या ६० ते ७० टक्के प्रवासी क्षमतेनं धावत आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने या ठिकाणी जाण्यासाठी पाच नवीन विशेष गाड्यांची घोषणा मध्य रेल्वेने के ली असून यामध्ये मुंबई-गोरखपूर स्पेशल, पुणे-दानापूर, मुंबई-पटना, मुंबई-गोरखपूर विशेष, मुंबई-दरभंगा अतिजलद विशेष या पाच गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनानंतर कमी के लेल्या रेल्वे गाड्या पूर्ववत करण्यासाठी दर महिन्याला रेल्वेकडून काही नवीन गाड्या सुरू केल्या जात आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.हेही वाचा -

  1. परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वरंटाईन सक्तीचं

  1. कोरोनाची लक्षणं नसलेल्यांची प्रतिजन चाचणी होणार नाही
Read this story in हिंदी
संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा