Advertisement

मालवाहू बसमुळं एसटीला २१ लाखांचे उत्पन्न

मालवाहतुकीतून एसटी महामंडळाच्या आतापर्यंत राज्यभरात मालवाहू बसच्या ५४३ फेऱ्या झाल्या आहेत.

मालवाहू बसमुळं एसटीला २१ लाखांचे उत्पन्न
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभमीवर एसटी महामंडळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याना वाहतूक सेवा पुरवत आहे. लॉकडाऊनच्या मागील २ महिन्यांपासून एसटी आपली वाहतूक सेवा देत आहे. परंतु, या लॉकडाऊनमुळं एसटीच्या उत्पनात मोठी घट झाली आहे. अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ तोट्यात असून, संचित तोटा ६ हजार कोटी रुपयांपेक्षा वाढला आहे. त्यामुळं यातून बाहेर येण्यासाठी महामंडळानं मालवाहतुकीकडं लक्ष केंद्रित केले. या मालवाहतुकीतून एसटी महामंडळाच्या आतापर्यंत राज्यभरात मालवाहू बसच्या ५४३ फेऱ्या झाल्या आहेत. 

मालवाहतुकीच्या माध्यमातून बेस्टला ३ हजार टन मालाची वाहतूक करण्यात आली असून, यातून २१ लाखांचा महसूल मिळाला आहे. एसटी महामंडळाच्या आदेशानुसार, राज्यातील ३१ विभागांमध्ये १० वर्षांचे आयुर्मान झालेल्या आणि ६.५० लाख किमी धावलेल्या प्रत्येकी १० प्रवासी बसचे रूपांतर मालवाहतूक वाहनात करण्यात येत आहे. 

आतापर्यंत ७२ बस मालवाहतुकीसाठी तयार झाल्या आहेत. महामंडळाच्या ताफ्यात ३०० मालवाहतूक बस (ट्रकमध्ये रूपांतरित) आधीच होत्या. आता एकूण ३७२ बस मालवाहतुकीसाठी उपलब्ध आहेत. २१ मेपासून आतापर्यंत ३ हजार टन मालाची वाहतूक करण्यात आली.

एसटीचे चालक-वाहक ही एसटी महामंडळाची २ चाकं आहेत. चालकांमुळं अपघात टाळणं शक्य होतं. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एका वर्षात सलग २६० दिवस अपघातविरहित सेवा पुरविणाऱ्या चालकांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात येत होता. मात्र आता ही योजना एसटी महामंडळानं बंद केली. कोरोना काळातील आर्थिक भार कमी करण्यासाठी ही योजना बंद करण्यात आल्याचे समजतं. त्यामुळ चालकांमध्ये नाराजी आहे.

‘सुरक्षित प्रवास, एसटीचा प्रवास’ या ब्रीद वाक्यानुसार, एसटीचे सर्व कर्मचारी विशेषत: चालक आपले कर्तव्य चोख पार पाडतात. चालकांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस म्हणून १ हजार रुपये दिले जात होते. मात्र आता योजना बंद करण्यासंदर्भातील परिपत्रक राज्यभरातील विभागीय कार्यालयांना एसटी महामंडळाने दिले.



हेही वाचा -

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाखांच्या वर

‘मिशन बिगीन अगेन’ घोषणेमुळे गोंधळ वाढला, फडणवीसांचा आरोप



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा