Advertisement

परदेशातुन परतणाऱ्यांसाठी मुंबईतील ३,३४३ हॉटेलरूम आरक्षित


परदेशातुन परतणाऱ्यांसाठी मुंबईतील ३,३४३ हॉटेलरूम आरक्षित
SHARES

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात सुरू लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळं वाहतुक सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळं लॉकडाऊनच्या काळात वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्यात येणार आहे. या नागरिकांना भारतात परत आणल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी विलगीकरण कक्षात ठेवलं जाणार आहे.

परदेशीयांना परत आणल्यानंतर खबरदारचा उपाय म्हणून महानगरपालिकेनं एकूण ८८ हॉटेलांमध्ये मिळून ३,३४३ कक्ष आरक्षित केले आहेत. विविध देशात अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांना हवाई आणि जलमार्गे भारतात परत आणण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. याचाच एक भाग म्हणून ७ मेपासून सुरू झालेल्या पहिल्या प्रयत्नांत विविध १२ देशांतून, ६४ विमान फेऱ्यांमधून एकूण १४,८०० प्रवासी भारतात येणार आहेत.

याअंतर्गत मुंबईमध्ये एकूण ७ विमानांतून सुमारे १,९०० नागरिक येणार असल्याचं समजतं. बांगलादेश, फिलिपिन्स, सिंगापूर, मलेशिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमधून हे नागरिक मुंबईत परतणार आहेत. परतलेल्या नागरिकांसाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी अलगीकरण केले जाणार आहे. अलगीकरण कालावधीत तपासणी केल्यानंतर कोरोनाबाधा झालेली आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे.

अलगीकरण करण्यासाठी मुंबईतील विविध ८८ हॉटेलांमध्ये एकूण ३,३४३ कक्ष आरक्षित करण्यात आले आहेत. यामध्ये दोन/ तीन/ चार /पाच तारांकित तसेच वेगवेगळ्या हॉटेलांसोबत अपार्टमेंट हॉटेल, ओयो बजेट हॉटेलचा देखील समावेश आहे.



हेही वाचा -

कोरोनाग्रस्त बेस्ट कामगाराचा मृत्यू

विद्यापीठाच्या परीक्षांबाबत शुक्रवारी जाहीर होणार निर्णय



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा