Advertisement

बेस्टच्या उत्पन्नात तब्बल 'इतकी' वाढ

लोकलसेवा केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असताना बेस्ट उपक्रमाने फेऱ्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे.

बेस्टच्या उत्पन्नात तब्बल 'इतकी' वाढ
SHARES

मुंबईत लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट वाहतूक सेवा पुरवत आहे. राज्यात अनलॉक १.० मुळं अनेक दुकानं व कंपन्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळं कर्मचारी वर्गही वाढला. अशातच बेस्ट आणि एसटीच्या प्रवासवेळी कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेता राज्य सरकारनं लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु, लोकलसेवा केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असताना बेस्ट उपक्रमाने फेऱ्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. लोकलसेवेची घोषणा झाल्यानंतर बेस्टने विशेष बससेवा बंद केल्याने मुंबईकर प्रवाशांना अधिक बससेवा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळं बेस्ट प्रवासी आणि महसुलात दररोज वाढ होत आहे.

सोमवारी बेस्टची प्रवासी संख्या ७ लाख ७८ हजारांवर जातानाच महसुलाचा आकडाही १० लाखांनी वाढला आहे. मुंबईत लॉकडाउन लागू होताच बेस्टनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष फेऱ्या सुरू केल्या होत्या. सोमवार, १५ जूनपासून अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरू झाल्यानंतर बेस्टवरील ताण थोडा कमी झाला आहे. त्यामुळं अत्यावश्यक सेवेशी संबंधित नसलेल्या नोकरदार, व्यावसायिकांनाही बेस्टमधून प्रवास करता येत आहे. परिणामी बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ होत उपक्रमाच्या उत्पन्नाताही भर पडू लागली आहे. त्यामुळे महसूल ७३ लाख ५२ हजार रुपयांवर गेला आहे.

मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या बससेवेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही तिकीट घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या निर्णयामुळं दररोजची तिकीट विक्रीही वाढत आहे. तसंच, अत्यावश्यक सेवेसाठी चालविण्यात येणाऱ्या फेऱ्यांची संख्या सुमारे १,८०० पर्यंत मर्यादित होती. ती संख्या आता दैनंदिन स्तरावर २,७०० वर पोहोचली आहे.

बेस्टच्या उत्पनात झालेली वाढ

तारीख
बसफेऱ्या
प्रवासी
उत्पन्न
१६ जून
२,६५४
५,९१,०७६
५६,०५,१३४
१७ जून
२,६५७
६,२५,९७४
५९,२८,४२१
१९ जून
२,७७६
७,७१,६५८
६५,४५,७२३
२० जून
२,४०३
६,५८,४८९
६२,०७,४५१
२२ जून
२,७००
७,७८,३६६ 
७३,५२,५६५



हेही वाचा -

Ramdev Baba : पतंजलीला नोटीस, आयुष मंत्रालयानं उचललं 'हे' कडक पाऊल

Salon And Beauty Parlor: सलून, ब्युटी पार्लर लवकरच सुरू करणार, ‘या’ मंत्र्याने दिली माहिती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा