Advertisement

लॉकडाऊनमुळं गाडीची कागदपत्रं ३१ जुलैपर्यंत वैध

सर्वसामान्यांना केंद्र सरकारनं दिलासा दिला आहे. लॉकडाऊनमुळं ही कागदपत्रं ३१ जुलैपर्यंत वैध राहणार आहेत.

लॉकडाऊनमुळं गाडीची कागदपत्रं ३१ जुलैपर्यंत वैध
SHARES

लॉकडाऊनच्या काळात दुचाकी चालवणाऱ्या अनेक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तसंच, नागरिकांना कागपत्राची चिंता आहे. लॉकडाऊनमुळं सर्व नुतनीकरण केंद्र बंद असल्यानं नुतनीकरण करायचे कसं असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसंच, कागदपत्र वैध नसल्यास पोलीस ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागणार अशीही चिंती सामान्यांना सतावत आहे. परंतु, सर्वसामान्यांना केंद्र सरकारनं दिलासा दिला आहे. लॉकडाऊनमुळं ही कागदपत्रं ३१ जुलैपर्यंत वैध राहणार आहेत. 

लॉकडाउनमुळे ड्रायव्हिंग लायसन्सचं नूतनीकरण, वाहन योग्यता प्रमाणपत्र, पीयूसी यांच्या नूतनीकरणाची चिंता सामान्यांना भेडसावत आहे. परंतु, आता लॉकडाउनमुळं ही कागदपत्रं ३१ जुलैपर्यंत वैध राहणार असून, आरटीओसंबंधी कामांसाठी विलंब शुल्कही माफ करण्याच्या सूचना केंद्रानं सर्व राज्यातील परिवहन विभागांना दिल्या आहेत.

सध्या मर्यादित मनुष्यबळामुळे आरटीओमध्ये नूतनीकरणाची कामे अतिशय संथ गतीनं होत आहेत. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं काढलेल्या आदेशानुसार, मोटार वाहनांशी संबंधित लायसन्स, वाहन योग्यता (फिटनेस) प्रमाणपत्र, वाहन परवाना, नोंदणीकरण १ फेब्रुवारी किंवा त्यानंतर संपत असतील ते ३१ जुलैपर्यंत वैध राहतील.

लॉकडाऊन काळात ज्या वाहनचालकांना वाहन नोंदणी आणि अन्य संबंधित कामांसाठी शुल्क भरता आले नाही, अशा १ फेब्रुवारीनंतरच्या सर्व वाहनचालकांकडून विलंब शुल्क आकारण्यात येऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. व्यावसायिक वाहनांची परमिट, पीयूसी अशा कागदपत्रांसाठी अडवणूक करू नये. लॉकडाउनमुळे अनेकजण कामांच्या शोधात बाहेर पडत असल्याने त्यांची वाहतूक विनाअडथळा होऊ द्यावी, अशा सूचना केंद्रीय मंत्रालयाने राज्यातील परिवहन विभागांना दिल्या आहेत. 



हेही वाचा -

एमएमआरसीकडून २ कोविड दक्षता सुविधा केंद्रांची उभारणी

ताजच्या मोफत जेवणाची मुदत संपली, निवासी डॉक्टरांना घरून डबे आणण्याची सूचना



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा