Advertisement

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी बस सोडा- राजू पाटील


गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी बस सोडा- राजू पाटील
SHARES

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्यात सर्वच सुविधा बंद आहेत. नेहमीच वर्दळ असणारी मुंबई सुद्धा बंद पडली आहे. राज्यात ३ महिने लॉकडाऊन करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळं वाहतूक सेवाही बंद होती. त्यामुळं अनेकांना आपल्या मुळ गावी जाण्यासाठी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. त्याशिवाय, मार्च महिन्यापासून लॉकडाऊनमुळं राज्यातील अनेक सण, उत्सवही रद्द करावे लागले आहेत. आता कोकणातील मोठा उत्सव असलेला गणेशोत्सव तोंडावर आला असताना मुंबईकर चाकरमान्यांच्या गावी जाण्याबाबत अनिश्चितता निर्माण झालेली आहे.

कोरोनामुळं अनेक मुंबईकरांना व राज्यातील अनेकांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाणं कठीण झालं आहे. त्यामुळं मनसेनं गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारनं सवलतीच्या दरात बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांनी या संदर्भात ट्वीटरवरून माहिती दिली आहे. 'गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना खासगी बसेस मनमानी भाडे आकारत आहेत. कोकणवासियांसाठी सवलतीच्या दरात बसेस उपलब्ध करून दिल्यास तसंच कोकणसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडल्यास या कठीण काळात त्यांना थोडा दिलासा मिळेल', असं त्यांनी म्हटलं.



हेही वाचा -

Barti Fellowship: यंदा ४०८ विद्यार्थ्यांना मिळणार डॉ. आंबेडकर फेलोशिप

उद्धवा! लाॅकडाऊन की अनलाॅक, काय ते ठरवा!!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा