Advertisement

महाराष्ट्राची लालपरी प्रथमच पोहचली 'या' सीमेपर्यंत


महाराष्ट्राची लालपरी प्रथमच पोहचली 'या' सीमेपर्यंत
SHARES

लॉकडाऊनच्या काळात एसटी महामंडळाची एसटी बस अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि राज्यातील विविध ठिकाणी अडकलेल्या परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या गावी परत पाठविण्यासाठी वाहतूक सेवा देत आहे. मागील अनेक दिवसांत एसटीनं प्रचंड लांबचा पल्ला घाठला आहे. त्यातला एक म्हणजे महाराष्ट्राची लालपरी थेट भारत - बांगलादेश सीमेपर्यंत गेली.

साताऱ्याहून निघालेली या बस ४ हजार ६०० किलोमीटरचा प्रवास केला असून, २४ स्थलांतरीतांना पश्चिम बंगालमधील नादिया इथं सोडलं. एवढ्या दूर अंतरापर्यंत प्रवास केलेली ही पहिली बस ठरली आहे. पश्चिम बंगालमध्ये जाण्यासाठी या १ लाख ९३ हजार ९२५ रुपये आकारण्यात आले. साताऱ्याहून १५ मे रोजी पहिली बस बांगलादेश सीमेपर्यंत रवाना झाली होती. आता दुसरी बसही पश्चिम बंगालमधील मालदासाठी रवाना झाली आहे. 

राज्य परिवहन मंडळानं एसटी बसच्यामार्फत ११ दिवसात १५ हजारहून अधिक बसमधून २ लाखाहून जास्त स्थलांतरीतांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले आहे. राज्य परिवहन मंडळाच्या साताऱ्याहून पश्चिम बंगालकडे गेलेल्या पहिल्या बसनं स्थलांतरीतांना त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी सोडलं आहे. महाराष्ट्रातूनच पुदुचेरी, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा येथे जाण्यासाठी आरक्षण करण्यात आले होते. मात्र पश्चिम बंगालचा टप्पा ऐतिहासिक ठरला आहे. 



हेही वाचा -

धारावीत क्वॉरंटाइनसाठी आणखी ४ हजार ४०७ खाटांची व्यवस्था

म.फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्वांना मिळणार आरोग्य विमा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा