Advertisement

धारावीत क्वॉरंटाइनसाठी आणखी ४ हजार ४०७ खाटांची व्यवस्था

मुंबईतील धारावीत कोरोना रुग्णांची मोठी संख्या आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आता धारावीत अनेक क्वॉरंटाइन सेंटर तयार करण्यात आली आहेत.

धारावीत क्वॉरंटाइनसाठी आणखी ४ हजार ४०७ खाटांची व्यवस्था
SHARES
Advertisement

मुंबईतील धारावीत कोरोना रुग्णांची मोठी संख्या आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आता धारावीत अनेक क्वॉरंटाइन सेंटर तयार करण्यात आली आहेत. या सर्व क्वॉरंटाइन सेंटरमध्ये ४ हजार ४०७ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

धारावीत अँथनी डिसिल्वा स्कूल, भारत स्काऊटस्‌ ॲण्ड गाइडस्‌ सभागृह, माहिम निसर्गोद्यान, राजीव गांधी क्रीडा संकूल यासह विविध ठिकाणी क्वॉरंटाइन सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे या क्वॉरंटाइन सेंटरमध्ये एकावेळी साडेचार हजार संशयित रुग्ण क्वॉरंटाइन केले जाऊ शकतील. धारावीत कोरोना काळजी केंद्र १ (सीसीसी १) अंतर्गत ३ हजार ७४० खाटांच्या क्षमतेची व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये माहिम निसर्गोद्यान समोरील ३५ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या भूखंडावर २०० खाटांच्या जम्बो फॅसिलीटीचाही समावेश आहे. या जम्बो फॅसिलीटीमध्ये प्रत्येक खाटावर ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोना काळजी केंद्र २ (सीसीसी २) अंतर्गत ६६७ खाटांची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. सीसीसी १ आणि सीसीसी २ मिळून एकूण ४ हजार ४०७ खाटा उपलब्ध आहेत. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी धारावी परिसरात काही दिवसांपूर्वी भेट दिली होती. यावेळी त्यांनी संस्थात्मक अलगीकरण वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे. हेही वाचा -

एमएमआरसीकडून २ कोविड दक्षता सुविधा केंद्रांची उभारणी
ताजच्या मोफत जेवणाची मुदत संपली, निवासी डॉक्टरांना घरून डबे आणण्याची सूचना
संबंधित विषय
Advertisement