Advertisement

मध्य रेल्वे मार्गावर अखेर क्यूआर कोड स्कॅनिंग सुरू

यंदा मध्य रेल्वे मार्गावर दैनंदिन सुमारे ३ लाख ३४ हजार ५०० अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे.

मध्य रेल्वे मार्गावर अखेर क्यूआर कोड स्कॅनिंग सुरू
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलची सेवा सुरू केली. मात्र, या प्रवासासाठी प्रवाशांना क्यूआर कोड बंधनकारक करण्यात आला आहे. त्यानुसार, यंदा मध्य रेल्वे मार्गावर दैनंदिन सुमारे ३ लाख ३४ हजार ५०० अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे.

राज्य सरकारनं ९५ आस्थापनांची यादी मध्य रेल्वेला दिली असून, गुरूवारपासून या कर्मचाऱ्यांसाठी क्युआरकोडची सुविधा सुरू केली आहे. यामध्ये सुमारे १ लाख ८० हजार ४०० प्रवाशांना क्युआर कोड वितरीत करण्यात आलं असून, दिड लाख कर्मचाऱ्यांचे फोटो अपलोड केले नसल्याने त्यांचा क्युआरकोडविनाच प्रवास सुरू आहे.

सुरूवातीला मध्य रेल्वे मार्गावर २०० लोकल फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या त्यापैकी १३० मुख्य मार्गावर तर ७० फेऱ्या हार्बर रेल्वे मार्गावर सोडण्यात आल्या. मात्र, कर्मचाऱ्यांची गर्दी लक्षात घेता पुन्हा १५० फेऱ्यांची वाढ करण्यात आल्यानंतर आता, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर एकूण ३५० फेऱ्या धावत आहे. या एकूण फेऱ्यांमधून राज्य सरकारनं अधिकृत करून दिलेल्या ९५ आस्थापनातील तब्बल ३ लाख ३४ हजार ५०० प्रवाशांचा प्रवास सुरू आहे.

मध्य रेल्वेनं सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएमएमटी) रेल्वे स्थानकावर क्यूआर कोड स्कॅनिंग मशिन सुरू केली आहे. त्यानंतर दादर, ठाणे, कुर्ला, कल्याण, घाटकोपर, डोंबीवली, पनवेल अशा महत्वांच्या स्थानकांवर या मशिन्स लावण्यात येणार असून, जीआरपी, आरपीएफ आणि तिकीट तपासणीकांचं ४९५ आयडी तयार करण्यात आले असून, मोबाईल ऍपद्वारे सुद्धा क्युआरकोड तपासले जाणार आहे.



हेही वाचा -

लोकल सेवा सुरू झाली तरी, रेल्वे स्थानकांवर मर्यादित प्रवेश

गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा