Coronavirus Updates: देशांतर्गत विमान वाहतूकही बंद, केंद्र सरकारचा निर्णय

सोमवारी सायंकाळी केंद्राच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने देशांतर्गत विमान सेवा (Domestic airline service) देखील थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमान वाहतूक सेवा पूर्णपणे बंद होणार आहे.

Coronavirus Updates: देशांतर्गत विमान वाहतूकही बंद, केंद्र सरकारचा निर्णय
SHARES

हवाई प्रवासाच्या माध्यमातून भारतात कोरोना व्हायरसला (coronavirus) घेऊन येणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा पूर्णपणे थांबवली आहे. त्यापाठोपाठ सोमवारी सायंकाळी केंद्राच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने देशांतर्गत विमान सेवा (Domestic airline service) देखील थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमान वाहतूक सेवा पूर्णपणे बंद होणार आहे.

हेही वाचा - Coronavirus: राज्यात आजपासून संचारबंदी लागू- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी काही वेळापूर्वीच देशांतर्गत विमान वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांना केल्याची माहिती दिली होती. खबरदारीचा उपाय म्हणून भारताने २२ मार्चपासूनच आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा बंद केली आहे. 

त्यानुसार नागरी उड्डाण मंत्रालयाने (civil aviation ministry) एक परिपत्रक काढून हा निर्णय जाहीर केला आहे. या परिपत्रकानुसार, देशांतर्गत व्यावसायिक प्रवासी विमान सेवा २४ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून बंद होणार आहे. त्यामुळे या दिवशी सर्व विमान कंपन्यांना त्यांच्या विमानसेवा रात्री १२ वाजण्याच्या आत बंद कराव्या लागतील.

हेही वाचा - Coronavirus Test : तपासणी करताना 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा

या निर्णयामुळे प्रवासी विमान वाहतूक थांबणार असली तरी मालवाहतुकीच्या विमानांना हा आदेश लागू नसेल. त्यामुळे विमानांद्वारे होणारी माल वाहतूक यापुढेही सुरळीतपणे सुरूच राहणार आहे. 


संबंधित विषय