Advertisement

'या' तारखेपासून एअर इंडियाची विशेष विमान सेवा

लॉकडाउनमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या घरी परतता यावं यासाठी विशेष विमान सेवा सुरू केली आहे.

'या' तारखेपासून एअर इंडियाची विशेष विमान सेवा
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये अनेक नागरिक अडकून पडले आहेत. दरम्यान केंद्रानं लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात परप्रांतीय मजूरांसाठी श्रमिक ट्रेन्स सुरू केल्यानंतर आता सरकार विमान कंपनी असलेली एअर इंडिया १९ मेपासून दोन जूनपर्यंत देशांतर्गत विशेष विमाने सोडणार आहे. ही विशेष विमानं लॉकडाउनमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या घरी परतता यावे, यासाठी देशाच्या वेगवेगळया शहरांदरम्यान उड्डाण करतील.

देशातील लॉकडाउनचा चौथा टप्पा १८ मे पासून सुरू होईल. त्यातच मंगळवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यातील नियम पूर्णपणे नवीन असतील असं जाहीर केलं. या हवाई प्रवासासाठी प्रवाशांना तिकिटाचे पैसे भरावे लागणार असून पण अद्याप यासाठी बुकिंग सुरु झालेले नाही.

दिल्लीहून १७३, मुंबईहून ४०, हैदराबादहून २५ आणि कोचीहून १२ विमानं उड्डाण करतील. दिल्लीहून जयपूर, बंगळुरु, हैदराबाद, अमृतसर, कोची, अहमदाबाद, विजयवाडा, गया, लखनऊ या शहरांमध्ये विमानं सोडण्यात येतील. मुंबईहून विशाखापट्टणम, कोची, अहमदाबाद, बंगळुरु, हैदराबाद आणि विजयवाडा या शहरांमध्ये विशेष विमानं सोडण्यात येतील.



हेही वाचा

तब्बल ४९ दिवसांनी धावली मुंबईतून पहिली ट्रेन

रेल्वे प्रवाशांसाठी आरोग्य सेतू अ‍ॅप आता बंधनकारक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा