Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

तब्बल ४९ दिवसांनी धावली मुंबईतून पहिली ट्रेन


तब्बल ४९ दिवसांनी धावली मुंबईतून पहिली ट्रेन
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि दिल्लीत सध्या रेड झोन आहे. या रेड झोनमुळं अनेक कामगारांनी घरची वाट धरली आहे. त्यामुळं या कर्मचाऱ्यांना घरी सोडण्यासाठी प्रवासी विशेष ट्रेन असलेली राजधानी एक्स्प्रेस मंगळवारी सध्याकाळी ५.३० वाजता मुंबई सेंट्रल स्थानकावरून सुटली. प्रत्येक प्रवाशाची तपासणी करून त्यानंतरच ट्रेनमध्ये बसण्यास परवानगी देण्यात आली असून या ट्रेनमधून सुमारे १ हजार ४८७ प्रवासी दिल्लीकडे रवाना झाले.

रेल्वे प्रशासनानं मंगळवारपासून टप्प्याटप्प्यानं पुन्हा रेल्वे सुरू केली. पहिल्या टप्प्यात देशातील ३० वातानुकूलित ट्रेन सुरू झाल्या आहेत. या ट्रेन नवी दिल्ली ते दिब्रुगढ, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, थिरुवनंतपुरम, मडगाव, अहमदाबाद व जम्मू-तावी या शहरांसाठी सोडण्यात येतील. परतीच्या प्रवासात पुन्हा त्याच स्थानकांवरून दिल्लीसाठी सुटतील. मंगळवारी मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली ‘राजधानी’प्रमाणे ट्रेन धावली. या गाडीला ११ तृतीय श्रेणीचे एसी डबे आणि ५ द्वितीय श्रेणीचे एसी डबे आहेत.

नवी दिल्लीकडे प्रवास करण्यासाठी प्रवासी मुंबई सेंट्रल स्थानकावर दुपारी १२ वाजल्यापासून गर्दी केली होती. त्यावेळी या कामगारांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस स्थानकावर तैनात होते. याशिवाय स्थानकावर ६ वैद्यकीय तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. प्रवाशांसह त्यांच्या सामानाचीही तपासणी करण्यात आली. प्रत्येक प्रवाशानं मास्क घातला होता. रेल्वे डब्यात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून आसन व्यवस्था केली होती.

या विशेष ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ, जेवण देण्यात येणार नाही. प्रवासी स्वत:चे जेवण, पिण्याचे पाणी व अंथरूण-पांघरूण घेऊन आले होते. तिकीट दरातून कॅटरिंगचे दर वजा करण्यात आले आहेत. त्यानुसार तृतीय श्रेणी एसीसाठी १ हजार ७९५, द्वितीय श्रेणी एसीला २ हजार ५८५ रुपये असा तिकीट दर आहे.हेही वाचा -

जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले इथले 'हे' ७ परिसर सील

धारावी, माहीम आणि दादरमध्ये ६३ नवे करोनाग्रस्तRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा