Advertisement

विमानातील प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, क्रू मेंबरसोबत प्रवासीही क्वारंटाईन

विमान सेवा सुरू केल्याच्या काही तासांतच विमानात प्रवास करणारा एक प्रवासी पॉझिटव्ह आल्याचं समोर आलं आहे.

विमानातील प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, क्रू मेंबरसोबत प्रवासीही क्वारंटाईन
SHARES

सोमवारपासून म्हणजेच २५ मेपासून देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यात आली. पण विमान सेवा सुरू केल्याच्या काही तासांतच विमानात प्रवास करणारा एक प्रवासी पॉझिटव्ह आल्याचं समोर आलं आहे. ही पहिली घटना नसून मगळवारी देखील असाच एक प्रवासी विमानातून प्रवास करताना आढळला. त्यामुळे देशातंर्गत विमान सेवा सुरू केल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

खासगी विमान कंपनी इंडिगोमधून (IndiGo) प्रवास करणारा एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus Positive) असल्याचं आढळला आहे. या विमानातील सर्व प्रवासी आणि क्रु मेंबर यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. सर्वांची कोरोना तपासणी केली जाणार आहे. त्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात येईल.

कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी चेन्नई ते कोईम्बतूर इंडिगो 6E 381नं प्रवास करत होता. कोईम्बतूर विमानतळावरच डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला सध्या कोईम्बतूर येथील ESI सुविधा केंद्रात क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यासोबतच काही नियमावली लागू करण्यात आली होती. त्यानुसार कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या प्रवाशानेही फेस मास्क, फेस शील्ड आणि ग्लोव्ह्ज घातले होते. एअरलाइन्स कंपनीच्या वतीनं असं म्हटलं आहे की, प्रवाशाच्या बाजूला कोणी बसले नव्हतेत्यामुळं कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता बरीच कमी आहे.

एअर इंडिया विमानात प्रवास करणारी व्यक्तीही कोव्हिड-19 (COVID-19) पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. एअर इंडियाच्या (Air India) वतीनं, 26 मे रोजी दिल्ली-लुधियाना AI9I837 विमानात प्रवास करणारा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.

एअर इंडियानं दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, एलायन्स एअरच्या सुरक्षा विभागात काम करणारा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळल्यानंतर सर्व प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.



हेही वाचा

रेल्वे आयसोलेशन कक्ष निरुपयोगी; पुन्हा गाडीत रुपांतर

बेस्टच्या ११० कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा