
राज्यात कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे लॉकडाऊनचा तिसरा टप्पा अवलंबण्यात आला आहे. यावेळी तिसऱ्या टप्प्यामध्ये काही नियम शिथिल करत काही विशेष गाड्यांनी अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. अशात नोकरी शिक्षण यामुळे शहरात अडकलेल्या लोकांना गावी जाता यावं यासाठी एसटीनं तिकीट बुकिंग सुरू केलं आहे.
एसटीनं आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी काही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. याद्वारे ऑनलाईन बुकिंग करून इच्छुक नागरिकांना त्यांच्या गावी जाता येणार आहे. पुढच्या २४ तासांमध्ये हे नंबर सुरू होतील अशी माहिती देण्यात आली आहे. तर ग्रुप बुकिंगही केलं जाऊ शकतं. ४४ रुपये प्रति किमी दरानं हा प्रवास असेल. म्हणजे मुंबई ते पुणे हा प्रवास २५० रुपयात होऊ शकेल.
एका बसमध्ये ४५ किंवा ५५ सीट्स असतील तर प्रत्येक सीटमागे साधारण २५० रुपये होतील. विद्याविहार, मुंबई सेंट्रल, परळ, नेहरू नगर, पनवेल, उरण डेपोमध्ये तुम्ही फोन करून बुकिंग करू शकता.
| आगार | संपर्क |
| विद्याविहार | 022- 25101182 |
| मुंबई आगार | 022-23072371 |
| परळ आगार | 022-24304620 |
| नेहरु नगर | 022-25522072 |
| पनवेल आगार | 022-27482844 |
| उरण आगार | 022-27222466 |
हेही वाचा
