Advertisement

भायखळा स्टेशनवर आता नव्या प्रणालीने सज्ज सीसीटीव्हींची नजर

रेल्वे स्थानकांवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या घटना लक्षात घेत सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलण्यात आले आहे.

भायखळा स्टेशनवर आता नव्या प्रणालीने सज्ज सीसीटीव्हींची नजर
SHARES

मध्य रेल्वेकडून (CR) भायखळा स्थानकावर क्लोज सर्किट टेलिव्हिजन (CCTV) कॅमेरे लावण्यात आले आहेत. येत्या 20 दिवसांत मस्जिद, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांचा समावेश केला जाईल. रेल्वे स्थानकांवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या घटना लक्षात घेत सुरक्षेच्या कारणास्तव मध्य रेल्वेने हे कॅमेरे बसवले आहेत. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 

निर्भया फंडाच्या मदतीने सुरक्षा यंत्रणा बसवली जात आहे. आत्तापर्यंत, 756 स्थानकांमध्ये ही यंत्रणा लावण्यात आली आहे. हा प्रकल्प CR च्या अधिकारक्षेत्रातील 364 स्थानकांवर 6122 कॅमेरे बसवण्याच्या मोठ्या योजनेचा एक भाग आहे.

CR पुढील दोन वर्षांत 150-200 कोटी खर्चून 76 उपनगरीय स्थानकांवर अत्याधुनिक CCTV स्थापित करेल. हे कॅमेरे तुमचा चेहरा ओळखण्याच्या प्रणालीसह सुसज्ज आहेत. तुम्ही चेहरा एखाद्या कपड्याने झाकला असेल तरी या प्रणालीद्वारे ओळक करता येणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण स्थानके वगळली जातील जेथे एकात्मिक सुरक्षा व्यवस्था आहे. इतर स्टेशन्स जिथे CCTV च्या जुन्या व्हर्जनला जास्त देखभालीची आवश्यकता आहे ते हळूहळू बदलले जातील.

टप्प्याटप्प्याने 76 स्थानकांवर एकूण 2,509 हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. यापैकी 297 चेहऱ्याची ओळख पटवण्याच्या प्रणालीने सुसज्ज असतील,” सीआर अधिकाऱ्याने सांगितले.

प्रत्येक स्टेशनला चेहरा ओळखण्याची प्रणाली असलेले चार ते 10 कॅमेरे मिळतील. प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त, हे कॅमेरे वेटिंग हॉल, आरक्षण काउंटर, पार्किंग क्षेत्र, मुख्य प्रवेशद्वार, फूट ओव्हर ब्रीज आणि बुकिंग ऑफिसमध्ये देखील लावले जातील. ते ऑप्टिकल फायबर केबलद्वारे जोडले जातील.

CR च्या मते, नवीन कॅमेर्‍यांमध्ये केवळ विस्तृत कव्हरेजच नाही तर ते सध्याच्या कॅमेर्‍यांच्या तुलनेत अधिक स्पष्टता देखील देतात. व्यापक कव्हरेजसाठी यात 180 अंश फिरण्याची क्षमता आहे.

“हे संभाव्य चुकीच्या लोकांसाठी प्रतिबंधक म्हणून काम करेल, देखरेख वाढवेल आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करेल. सुधारित वैशिष्ट्यांमध्ये व्हिडीओ अॅनालिटिक्स आणि व्हिडिओ मॅनेजमेंट सिस्टमचा समावेश आहे, तर पॅन-टिल्ट-झूम (PTZ) कॅमेरे ब्लाइंड स्पॉट्स दूर करतील,” असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले.



हेही वाचा

मध्य रेल्वेवर आणखी एक रेल्वे स्टेशन बांधले जाणार

India Vs Pakistan मॅचसाठी मुंबईतून दोन विशेष वंदे भारत धावणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा