Advertisement

'मरे'वर बुधवारी विशेष ट्रॅफिक ब्लॉक


'मरे'वर बुधवारी विशेष ट्रॅफिक ब्लॉक
SHARES

मुंबई - मध्ये रेल्वेवर रुळाच्या देखरेखीसाठी बुधवारी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. पळसदरी ते कर्जत अप मार्गावर तीन तासांचा आणि निळजे ते तळोजा दरम्यान देखील डाउन मार्गावर हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. बुधवार आणि गुरुवार सकाळी १൦.३५ ते दुपारी १.३५ वाजेपर्यंत हा तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

ब्लॉकदरम्यान खोपोलीवरून सुटणारी सकाळी १൦.२൦ आणि स.११.३०ची खोपोली-कर्जत तसेच कर्जतवरून सुटणारी सकाळी १०.५५ आणि १२.०५ची कर्जत-खोपोली या दोन्ही गाडया पळसदरी ते कर्जत या स्थानकांपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेस हैदराबाद-मुंबई (१७०३२), कोईम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (११०१४) या गाडयांना पळसदरी स्थानकांदरम्यान थांबा देण्यात येणार आहे.

निळजे ते तळोजा स्थानकांदरम्यान डाउन मार्गावरील सकाळी ९.३५ ते दुपारी १.०५ वाजता हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावरी एक्स्प्रेस (१६३४५) ही दिवाला जंक्शन यथे ३५ मिनिटे तर इंदूर जंक्शन- कोच्चवेली एक्स्प्रेस (१९३३२) ही गाडी दातीवली स्थानकांत ४० मिनिटे तर वसई रोड- पनवेल (६९१६८) मेमू ही गाडी दातीवली स्थानकांत ५ मिनिटे उशीराने पोहोचणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा