Advertisement

सीएससएमटी रेल्वे स्थानक 'हरित' स्थानक

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वेस्थानकाची हरितस्थानकाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे.

सीएससएमटी रेल्वे स्थानक 'हरित' स्थानक
SHARES

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वेस्थानकाची हरितस्थानकाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. या स्थानकाला सीआयआयच्या इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून ग्रीन रेल्वे स्टेशन रेटिंगनुसार सुवर्ण प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. हे पश्चिम विभाग आणि महाराष्ट्रातील पहिलं स्थानक ठरलं आहे.

इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गुरमितसिंग अरोरा यांच्याकडून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल आदींनी हा पुरस्कार स्वीकारला. सीआयआय-आयजीबीसी भारतीय रेल्वेबरोबर ग्रीन डीआरएम इमारती, ग्रीन रेल्वे शाळा/रुग्णालये/प्रशिक्षण केंद्रे आणि ग्रीनको (कार्यशाळांसाठी) इत्यादी अनेक हरित उपक्रमांवर बारकाईनं काम करत आहे.

रेल्वे स्थानकाची वैशिष्ट्यं

  • दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी अनुकूल अशी स्टेशनची रचना करण्यात आली आहे.
  • पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक २ आणि ४ व्हिलरला प्रोत्साहन देण्यासाठी ५ टक्के पार्किंग स्पेससाठी इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट्स.
  • स्थानकावर च्या जागेच्या १५ टक्क्यांहून अधिक जागा झाडं आणि छोट्या उद्यानांनी व्यापलेली आहे.
  • विविध कार्यालये आणि वेटिंग रूममध्ये बसवलेले १७ ऑक्युपेशन सेन्सर्स.
  • स्टेशनवर निर्माण होणाऱ्या ८३ टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते आणि यापैकी  १०० टक्के पाणी स्थानकात वापरले जाते.
  • वायफाय, ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन, टुरिझम इन्फॉर्मेशन अँड बुकिंग सेंटर, फूड कोर्ट, फार्मसी अँड मेडिकल सुविधा.
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा