Advertisement

जानेवारीत सुरू होणार सीएसटीएम ते गोरेगाव हार्बर मार्ग


जानेवारीत सुरू होणार सीएसटीएम ते गोरेगाव हार्बर मार्ग
SHARES

जानेवारी २०१८ पासून सीएसटीएम ते गोरेगाव हार्बर मार्ग सुरू होण्याची चिन्हे आहेत. मुंबई रेल विकास प्राधिकरणा (एमआरव्हीसी)चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार अंधेरी ते गोरेगाव दरम्यानच्या ट्रॅकचं काम पूर्ण होत अालं आहे. हा ट्रॅक ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सुरू होईल.

इथे नुकतंच घेण्यात आलेलं इंजिन ट्रायल रनही यशस्वी झालं आहे. त्यामुळे हा मार्ग सुरू झाल्यास १ लाखांहून अधिक प्रवाशांना त्याचा फायदा होईल.

सद्यस्थितीत पश्चिम रेल्वेच्या ३७ सेवा आणि मध्य रेल्वेच्या ५२ सेवा अंधेरी येथील हार्बर मार्गावर समाप्त होतात. हा ट्रॅक गोरेगावपर्यंत विस्तारीत झाल्यानंतर या सेवांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अंधेरी ते गोरेगाव दरम्यान जून २०१७ मध्ये करण्यात आलेलं ट्रायल रन यशस्वी झाल्याने जानेवारीपासून हा मार्ग सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सद्यस्थितीत सीएसएमटी ते बोरीवली दरम्यान केवळ एकच गाडी चालवण्यात येते. या नवीन विस्तारीत मार्गामुळे चर्चगेट ते बोरीवली दरम्यानच्या मार्गावरील भार कमी करण्यास मदत होईल, असं रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.


सीएसटीएम ते गोरेगाव विस्ताराचं काम

  • २००८- हार्बर मार्गावर अंधेरी ते गोरेगाव विस्तार योजनेचा मुंबई शहरी परिवहन परियोजने(एमयूटीपी)च्या दुसऱ्या टप्प्यात समावेश
  • २००९- या मार्गासाठी ट्रकलगतची जमीन अधिग्रहण सुरू
  • २०११-२०१२ ट्रॅक बनवण्याच्या कामाला सुरूवात
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement