Advertisement

पश्चिम रेल्वेमार्गावरील 'या' स्थानकांची होणार दुरूस्ती

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करत असते.

पश्चिम रेल्वेमार्गावरील 'या' स्थानकांची होणार दुरूस्ती
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करत असते. रेल्वे स्थानकांचा कायापालट करणे, लोकल फेऱ्या वाढविणं अशा विविध सुविधा रेल्वेनं प्रवाशांसाठी उपलब्ध केल्या आहेत. अशातच अनेक स्थानकांची दुरस्ती केली जात असून नुतनीकरण केलं जात आहे. त्यानुसार, पश्चिम रेल्वेमार्गावरील ग्रँट रोड, चर्नी रोड, महालक्ष्मी आणि दादर स्थानकांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. या रेल्वे स्थानकांच्या दुरूस्तीचं काम मार्च २०२२ पर्यंत पुर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात अनेक पादचारी पूल एकमेकांना जोडले आहेत. त्यामुळं प्रवाशांना एका स्थानकातून दुसऱ्या स्थानकात, तसंच पर्व-पश्चिम असा प्रवास सहज करता येतो. चर्चगेट स्थानकाच्या दक्षिण परिसरातील जुन्या तिकीट बुकिंग कार्यालय पाडण्यात आले असून त्याचे बांधकाम सुरू आहे. शिवाय एका जुन्या पुलाचीही महापालकेकडून पुनर्बांधणी केली जात आहे.

पश्चिम रेल्वे दादर स्थानकातील नव्या इमारतीत कार्यालये आणि इतर सुविधा समाविष्ट करण्यासाठी रेखाचित्रे तयार करत आहे.

महालक्ष्मी येथील एलिव्हेटेड बुकिंग ऑफिसचं नूतनीकरण केलं आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि नागरी संस्था जुन्या महालक्ष्मी रोड पुलाची केबल-स्टेड ब्रिजसह पुनर्बांधणी करणार आहे. चर्नी रोड आणि ग्रँट रोड इथं तिकीट बुकिंग कार्यालयांसह नवीन स्टेशन इमारती लवकरच सुरू होणार आहे.

मध्य रेल्वेनं जून २०२२ पर्यंत सर्व ब्रिटिशकालीन ओव्हरहेड इक्विपमेंट मास्ट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा