Advertisement

भाडेवाढीचा 'बेस्ट'ला फायदा, ५०४ कोटींची तूट झाली कमी!


भाडेवाढीचा 'बेस्ट'ला फायदा, ५०४ कोटींची तूट झाली कमी!
SHARES

तोट्यात गेलेल्या बेस्टला पुन्हा नफ्यात आणण्यासाठी महापालिकेने दिलेल्या कृती आराखड्यातील काही शिफारशी बेस्ट समितीने मान्य केल्या आहेत. बस भाड्यात केलेली वाढ आणि कर्मचाऱ्यांचे गोठवलेले भत्ते यामुळे बेस्टची तब्बल ५०४ कोटींची तूट भरून निघणार आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी अर्थसंकल्प अंदाजावर आपले निवेदन करत ५०४ रुपये तूट कमी होणार असल्याचे म्हटले आहे.


८८० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प

बेस्ट उपक्रमाच्या २०१८-१९या अर्थसंकल्पात ८८०.८८ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प प्रशासनाने समितीला सादर केला होता. यामध्ये आता व्यवस्थापकांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात २२८.२१ कोटींची तूट तर बेस्ट समितीने कृती आराखड्यातील विविध शिफारशींना मान्यता दिल्याप्रमाणे ३७६.७० कोटींची तूट राहील, असे महाव्यवस्थापकांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.


विरोधकांचा आक्रमक विरोध

उपक्रमाची हलाखीची आर्थिक स्थिती सुधारण्याकरता अंमलात आणावयाच्या विविध योजनांसंदर्भातील सूचना बेस्ट समितीने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मंजूर झालेल्या सुधारणांमुळे उपक्रमाचे फायदे होणार असल्याचे महाव्यवस्थापकांनी नमूद केले आहे. मात्र, बेस्ट समिती सदस्य व महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मात्र, कृती आराखड्याला काँग्रेसचा तीव्र विरोध असल्याचे म्हटले आहे.

बेस्ट उपक्रमाची सेवा व सुविधा ही मुंबईकरांना चांगल्या प्रकारे मिळायला हवी. प्रवाशांसाठी पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टिम अंमलात आणली जावी. तसेच ६० ते ७० टक्के बसेस या दहा वर्षे जुन्या आहेत. मागील २० वर्षांत शिवसेना आणि भाजपाने बेस्टची अवस्था हलाखीची करून ठेवली आहे. आजच्या परिस्थितीला शिवसेना आणि भाजपा जबाबदार असून तब्बल ३०० बसेसचे मार्ग बंद करण्यात येणार आहेत. तसेच भाडेवाढ केल्यामुळे निश्चित प्रवाशांचे हाल होणार असून त्यापासून मिळणारा महसूलही कमी होणार असल्याची भीती रवी राजा यांनी व्यक्त केली.


मान्य झालेल्या शिफारशी आणि वाचणारा पैसा

ब श्रेणीतील अधिकाऱ्यांचा कार्यभत्ता थांबवणे : २८ लाख रुपये
मनुष्यबळाचे नियोजन : ८५ कोटी रुपये
शाळा, कॉलेजमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी वह्या, पुस्तकांसाठी अर्थसहाय्य : ३.३४कोटी
शिष्यवृती योजना : ६.५० कोटी रुपये
गृहकर्जावरील अर्थसहाय्य व्याजाची योजना बंद करणे : ४ कोटी रुपये
अ श्रेणीतील अधिकाऱ्यांची संख्या कमी करणे : २.८४ कोटी रुपये
वाहतूक भत्ता बंद करणे, प्रवासभत्ता बंद करणे : १ कोटी रुपये
नैमित्तिक रजेचे रोखीकरण स्थगित करणे : ९.७७ कोटी रुपये
सर्व प्रकारचे प्रोत्साहन भत्ते गोठवणे : ९.१७ कोटी रुपये
बसताफ्याचे पुनर्नियोजन : २४२ कोटी रुपये
बस मार्गांचे पुनर्नियोजन : ७० कोटी रुपये
दैनंदिन बसपास दरात वाढ : ४.५५ कोटी रुपये
आनंददायी योजना बंद करणे : ६.८८ कोटी रुपये
शालेय, कॉलेजच्या मुलांना बसपास दरात वाढ : ५.५० कोटी रुपये
बस भाडेवाढ : ५३.३५ कोटी रुपये


अमान्य केलेल्या शिफारशी

महागाई भत्ता गोठवणे : ४६ कोटी रुपये
वैद्यकीय भत्ता थांबवणे : २५.२४ कोटी रुपये
उपहारगृह कंत्राटदारांना देण्यात येणारे अर्थसहाय्य : ७ कोटी रुपये
रजा प्रवास भत्ता गोठवणे : १६ कोटी रुपये
रोख रक्कम हाताळणे भत्ता बंद करणे : २२ लाख रुपये
अतिकालिन भत्ता गोठवणे : २३.०६ कोटी रुपये
भाडेतत्त्वावर बसगाड्यांच्या फेऱ्या : १८ कोटी रुपये



हेही वाचा

पुढचं वर्ष बेस्ट भाडेवाढीचं? 1 ते 12 रुपयांपर्यंतची वाढ?

आशिष शेलार म्हणतात 'बेस्ट नौटंकी'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा